Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ट्रॅक्टर उलटल्याने दोघांचा जागीच मृत्यू!

अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा-देचली मार्गावरील घटना.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
अहेरी, दि. २८ ऑक्टोंबर : शेतीचे कामकाज आटपवून देचली वरून छल्लेवाडा या गावाकडे जात असताना ट्रॅक्टर चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक्टर खड्ड्यात उलटल्याने चालकासह सोबत असलेले सहकारी या दोघांचा ट्रॅक्टर मध्ये दबून जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी जिमलगट्टा पासून दोन किमी अंतरावर असलेल्या देचली रोडवर घडली आहे.

या ट्रॅक्टर दुर्घटनेत मृत पावलेल्या इसमांचे नाव सुनील महेश अटकर रा.रसपल्लीचा तर ट्रॅक्टर चालक अंकीत सिडाम रा. कोडसेलगुडमचा आहे. सदर घटनेतील ट्रॅक्टर मालक हे तेलंगणातील असल्याची प्राथमिक माहिती आहे.

आज सकाळच्या सुमारास देचली येथे शेतीचे कामकाज आटोपून फार्मर्ट्रक कंपनीचा ट्रॅक्टरनी देचलीवरून जिमलगट्टा मार्गे छल्लेवाडा जात असतांना ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाताच ट्रॅक्टर उलटली आणि त्यात ट्रॅक्टर चालक अंकित सिडाम व सुनील अटकर ट्रॅक्टर च्या खाली दबल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती आजूबाजूच्या परिसरात माहिती होताच घटनेस्थळी एकच गर्दी निर्माण झाली असून दोघेही मृतक गरीब कुटुंबातील असल्याने कुटुंबातील मुख्य आधारच हरपल्याने परिवारावर मोठे संकट ओढले असून परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त केली जात आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर या दुर्घटनेची माहिती जिमलगट्टा पोलिसांना होताच घटनास्थळी गाठून घटनेचा पंचनामा करून मर्ग दाखल करून दोन्ही मृतकाचे शव ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी उप जिल्हा रुग्णालय अहेरी येथे पाठविण्यात आले आहे.
हे देखील वाचा :

धक्कादायक ! ४५ वर्षीय महिलेवर सामुहिक अत्याचार

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नवाब मलिक यांच्याविरोधात समीर वानखेडे यांच्या बहिणीची राष्ट्रीय महिला आयोगात तक्रार दाखल

अंगणवाडी सेविकांना दोन हजार रूपयांची भाऊबीज भेट – महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.