Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

घरकुलाचा निधी व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गाजली धानोरा तालुक्याची आढावा बैठक

दिलेल्या सूचनांचे काटेकोरपने पालन करा - खा. अशोक नेते

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

धानोरा दि. २८ ऑक्टोंबर :  धानोरा तालुक्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा. अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या सभागृहात आज दि. २८ ऑक्टोबर रोजी पार पडली.

या बैठकीला प्रामुख्याने भाजपचे आदिवासी मोर्चा चे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, पं स सभापती अनुसयाताई कोरेटी, ज्येष्ठ नेते साईनाथजी साळवे, जि.प. सदस्य लताताई पुंघाटे, तालुका अध्यक्ष शशिकांतजी साळवे, नायब तहसीलदार वाकुडकर, बीडीओ कोमलवार, नगर पंचायत चे मुख्याधिकारी बेम्बरे, तसेच सर्व विभागाचे अधिकारी, विभाग प्रमुख उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या बैठकीत घरकुलचा प्रलंबित निधी तात्काळ देणे व शेतकऱ्यांना अतिक्रमणचे पट्टे देणे, कृषी पंपाचे विद्युत कनेक्शन देणे, रोहयोची कामे सुरू करणे, शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देणे, तसेच नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने सर्व्हेक्षण करून नुकसान भरपाई देणे इत्यादी अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करून ते सोडविण्यासाठी सूचनांचे काटेकोरपने पालन करण्याचे निर्देश यावेळी खा. अशोक नेते यांनी दिले.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

ट्रॅक्टर उलटल्याने दोघांचा जागीच मृत्यू!

धक्कादायक ! ४५ वर्षीय महिलेवर सामुहिक अत्याचार

नवाब मलिक यांच्याविरोधात समीर वानखेडे यांच्या बहिणीची राष्ट्रीय महिला आयोगात तक्रार दाखल

 

 

Comments are closed.