Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रिक्त पदे भरण्याबाबत कालबध्द आराखडा तयार करावा – वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

लोकस्पर्श न्युज नेटवर्क;

मुंबई डेस्क, दि. 28 ऑक्टोंबर : वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य विभागातील वर्ग 1 आणि वर्ग 2 ची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येत असून याबाबत कार्यवाही सुरु आहे. मात्र वर्ग 3 आणि वर्ग 4 ची रिक्त पदे विभागामार्फत भरण्यात येणार असल्याने रिक्त पदे भरण्याबाबतचा कालबध्द आराखडा दोन्ही विभागामार्फत तयार करण्यात यावा अशा सूचना वैद्यकीय शिक्षण तथा सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिल्या.

आज मंत्रालयात अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही‍ विभागांच्या रिक्त पदांबाबतचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, फिल्मिसिटीचे व्यवस्थापकीय संचालक कैलास पगारे, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मंत्री अमित  देशमुख म्हणाले की, दोन्ही विभागांतील रिक्त पदे पाहता ही रिक्त पदे भरण्याबाबत तातडीने कार्यवाही होणे आवश्यक आहे. रिक्त पदे भरीत असताना ही पदे कशा पध्दतीने भरण्यात येतील याबाबत आराखडा तयार करण्यात यावा. विभाग पदे भरीत असताना परीक्षा घेण्यासाठी कोणत्या संस्थेची निवड कशा पध्दतीने करण्यात येणार आहे, ज्या पदांची भरती करण्यात येणार आहे त्या पदांचे भरती नियम याबाबत सर्व नियोजतन करण्यात यावे. तसेच विभागाचा आढावा घेताना पदोन्नती, विभागाचा आकृतीबंध या सगळया बाबी तपासून घेण्याचे निर्देशही यावेळी दिले.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नवाब मलिक यांच्याविरोधात समीर वानखेडे यांच्या बहिणीची राष्ट्रीय महिला आयोगात तक्रार दाखल

ट्रॅक्टर उलटल्याने दोघांचा जागीच मृत्यू!

धक्कादायक ! ४५ वर्षीय महिलेवर सामुहिक अत्याचार

Comments are closed.