Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

तू माझी नाही तर कुणाचीही नाही; लग्नास नकार दिल्याने प्रियकराने केली आपल्याच प्रियसीची हत्या!

लाखनी तालुक्यातिल पालांदुर कब्रस्थान परिसरातील घटना. पालांदुर पोलिसांनी आरोपीला केली अटक.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

 

भंडारा, दि. ३० नोव्हेंबर : लाखनी तालुक्यातिल पालांदुर कब्रस्थान परिसरात युवतीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.मृतक युवतीचे नांव शिल्पा तेजराम फुल्लूके (१९) रा. मरेगांव असे असुन मृतदेहाजवळ रक्तरंजित चाकु व विषाची बाटली सापडल्याने युवतीची हत्या की आत्महत्या असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मृतक युवती संताजी कला व वाणिज्य महाविद्यालयाची द्वितीय वर्षाची विद्यार्थीनी असुन तिच्या आई वडिलांनी तिचे लग्न करून देण्याचे ठरवल्याने तिला पाहण्यासाठी युवक येणार होता. त्यामुळे ती बाजारातून काही सामान खरेदीच्या बहाण्याने सकाळी ११.०० वाजताच्या सुमारास घरून निघाली. बराच वेळ होऊनही ती घरी परत न आल्याने तिच्या घरच्यांनी शोधाशोध सुरु केली. त्यानंतर तिचा मृतदेहच पालांदुर अड्याळ रस्तावरील कब्रस्थानाजवळ निर्जन स्थळी, संदिग्ध अवस्थेत आढळून आला. मृतदेहाजवळ रक्तरंजित चाकु तथा विषाची बाटली सापडल्याने मृत्यूचे गुढ वाढले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

         मृतक शिल्पा तेजराम फुल्लूके
                 आरोपी नयन शहारे (प्रियकर)

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

घटनेची माहिती पोलिस विभागाला प्राप्त होताच पालांदुर पोलिसांनी सदर घटनेचा उलट सुलट तपास केला असता तपासाअंती मुलीचा प्रियकर नयन शहारे (१९) हा लग्नाची मागणी घालायला शिल्पाच्या घरी आला होता. मात्र शिल्पाच्या घरच्या लोकांनी लग्नास नकार दिल्याने प्रियकराने याचा राग मनात धरून शिल्पाच्या हाताची नस कापून खूण केला असल्याची कबुली आरोपीने दिली असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

हे देखील वाचा :

कोरोनाच्या ओमीक्रॉन या नव्या व्हेरियंट मुळे यंदा ६ डिसेंबरला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी न करता घरूनच अभिवादन करावे -केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले 

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित शिक्षणासाठी इन्फोसिस कंपनीसोबत सांमजस्य करार

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी ‘जन-वन विकास’ योजने अंतर्गत कुक्कुटपालनासाठी तीनशे लाभार्थ्यांना वन विभागाने दिला लाभ

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.