Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या सुरक्षा रक्षकाची डोक्यात गोळी घालुन आत्महत्या!

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

अहेरी, दि. २० फेब्रुवारी : अहेरी येथील पॉवरहाऊस कॉलोनी मधील एका अपार्टमेंट मध्ये पोलीस शिपायाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना दि. २० फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री ८.००  वाजताच्या सुमारास  उघडकीस आली आहे.

प्रमोद शेकोकर असे पोलीस शिपायाचे नाव असून ते आ. धर्मरावबाबा आत्राम यांचयाकडे सुरक्षा गार्ड म्हणून काही दिवसांपूर्वी रुजू झाल्याची माहिती आहे. त्यांची पत्नी ही ताडगाव पोलीस मदत केंद्रात कार्यरत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

घटनेची माहिती पोलीस विभागाला प्राप्त होताच उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरवाजा आतमधून बंद असल्याने दुसऱ्या घरातून पोलिसांनी आतमध्ये प्रवेश केला. आत्महत्यचे कारण अद्याप कळू शकले नाही. पोलिसांनी शव ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. प्रमोद शेकोकर हे मूळ बुलढाणा जिल्ह्याचे असल्याची माहिती आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तेलंगणा सख्खा शेजारी, त्याच्याशी विविध क्षेत्रातील सहकार्य वाढवणाऱ्यावर भर देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुणे ते महू भीमज्योत मशाल यात्रेचे महू येथे जोरदार स्वागत

मराठीला ‘अभिजात’ दर्जाच्या मागणीची ४ हजार पोस्ट कार्डस राष्ट्रपतींकडे रवाना

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.