Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मराठीला ‘अभिजात’ दर्जाच्या मागणीची ४ हजार पोस्ट कार्डस राष्ट्रपतींकडे रवाना

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संच रवाना.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई डेस्क, दि. २० फेब्रुवारी : मराठी भाषेला “अभिजात” भाषेचा दर्जा मिळावा मागणीची ४ हजार पोस्ट कार्डस आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रवाना करण्यात आली.

याप्रसंगी वर्षा शासकीय निवासस्थानी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, खासदार अरविंद सावंत उपस्थित होते.
मराठी भाषेला “अभिजात” दर्जा प्राप्त व्हावा यासाठी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली एक जन अभियान सुरू करण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हा “अभिजात” दर्जा २७ फेब्रुवारी २०२२ रोजी मराठी भाषा दिवस आहे त्याआधी मिळावा, यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते सुमारे ४ हजार पोस्ट कार्ड्स महामहीम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठविण्यात आली. हा पोस्ट कार्ड्स पाठविण्याचा दुसरा संच आहे, याआधी सुद्धा एक संच राष्ट्रपती महोदयांना पाठविण्यात आला आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

धक्कादायक! नदी पात्रात बुडून युवकाचा मृत्यू; नदीवर आंघोळ करायला जाणे बेतले जीवावर

अहेरी विधानसभेत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला मोठा धक्का : आ. धर्मरावबाबा आत्राम यांचे खंदे समर्थक शैलेश पटवर्धन यांचा आ.वि.स. मध्ये जाहीर प्रवेश..

Comments are closed.