Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

ठाणे, दि. २० फेब्रुवारी : नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो अर्थात एनसीबीच्या मुंबई विभागाचे वादग्रस्त माजी संचालक समीर वानखेडे यांच्याविरुद्ध बनावट कागदपत्रे आणि खोट्या माहितीच्या आधारे मद्यविक्री परवाना मिळविल्याप्रकरणी ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा शनिवारी दाखल झाला आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या नवी मुंबई विभागाने ही फिर्याद दाखल केल्याने एनसीबीच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे.

एनसीबीमध्ये धडाकेबाज कारवायांमुळे चर्चेत असलेले कालांतराने आर्यन खानवरील कारवाईनंतर वादाच्या भोव:यात सापडलेल्या वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी एकापेक्षा एक आरोप केल्याने ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आता त्यांच्या अडचणींध्ये आणखीनच वाढ झाली आहे. नवी मुंबईतील सद्गुरु हॉटेलसाठी वयाच्या सतराव्या वर्षी नावावर बार परवाना घेतल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी ते सज्ञान असल्याचे म्हटले होते. त्या जागेमध्ये कोणताही व्यवसाय केला नसल्यामुळे आयकर आणि विक्रीकर विवरणपत्र सादर केले नसल्याचेही म्हटले होते. ते सज्ञान असल्याबाबतची चुकीची माहिती दिली होती. त्यांनी २१ ऑगस्ट १९९७ रोजीच्या एक हजार रुपये दराच्या प्रतिज्ञापत्रवर झहिदा वानखेडे यांच्यासमवेत केलेल्या भागीदारीपत्राची प्रत दिली होती. त्यामध्ये त्यांच्या वयाचा उल्लेख नाही.

यावरून त्यांनी त्यांच्या वयाचा संभ्रम व्हावा तसेच २१ वर्षांपेक्षा कमी असल्याचे लक्षात येऊ नये असा हेतू होता. कायदेशीररीत्या वानखेडे हे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सक्षम नव्हते. त्यांनी या कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्याचे आढळले. त्यांची १४ डिसेंबर १९७९ ही जन्मतारीख असल्याचे त्यांनी कळविले होते. ते १८ वर्षांपेक्षा कमी असतांनाही त्यांनी प्रतिज्ञापत्र केले. मद्यविक्री अनुज्ञाप्तीसाठी वयाचा अडसर येऊ नये म्हणूनच त्यांनी प्रतिज्ञापत्रात सज्ञान असल्याचे म्हटले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्यामुळेच ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नवी मुंबईतील वाशी येथील हॉटेल सद्गुरु या हॉटेलच्या अनुज्ञप्तीचे व्यवहार २ फेब्रुवारी २०२२ रोजी कायमस्वरुपी रद्द केले. खोटी माहिती देऊन शासनाची फसवणूक दिल्याने त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाईला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिल्याने १९ फेब्रुवारी २०२२ रोजी वानखेडे यांच्याविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक सत्यवान गोगावले यांनी फसवणुकीसह विविध कलमान्वये कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

हे देखील वाचा : 

उपविभागीय वनाधिकारी देवगडे यांची पत्रकारांशी उद्धट वागणूक; म.रा.प. संघटनेतर्फे निवेदन देऊन केला तीव्र निषेध

 

पुणे ते महू भीमज्योत मशाल यात्रेचे महू येथे जोरदार स्वागत

नक्षलवाद्यांना स्फोटक साहित्य पुरवठा करणारे ४ आरोपी पोलिसांच्या ताब्यात तर १ आरोपी फरार

अहेरी विधानसभेत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला मोठा धक्का : आ. धर्मरावबाबा आत्राम यांचे खंदे समर्थक शैलेश पटवर्धन यांचा आ.वि.स. मध्ये जाहीर प्रवेश..

 

Comments are closed.