Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नक्षलवाद्यांना स्फोटक साहित्य पुरवठा करणारे ४ आरोपी पोलिसांच्या ताब्यात तर १ आरोपी फरार

शीघ्र कृती दल व दामरंचा पोलिसांची मोठी कारवाई.. पोलिसांनी मुदेमाल केला जप्त.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. २० फेब्रुवारी :  उपपोस्टे दामरंचा पोस्टे पार्टी व शिघ्र कृती दल (क्युआरटी) दामरंचाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना तेलंगणामधून दामरंचा मार्गे छत्तिसगड येथे वाहतुक करीत असलेल्या ०४ इसमांकडुन १० नग कार्डेक्स वायरचे बंडल एकुण ३५०० मीटर लांबीचे व ईतर नक्षल साहित्य जप्त करण्यात यश आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नक्षलवादयांना सदरचे साहीत्य पुरवठा  करणाऱ्यांचे नाव राजु गोपाल सल्ला (३१) रा. आसिफनगर, एनटीआर कॉलनि, जि. करीमनगर (तेलंगणा), काशिनाथ ऊर्फ रवि मुल्ला गावडे (२४) रा. भंगारामपेठा ता. अहेरी,  साधु लच्चा तलांडी (३०)मोहम्मद कासिम शादुल्ला रा. एनटीआर तामिल कॉलनि, बाबुपेठ, आसिफनगर जि. करीमनगर (तेलंगणा),  छोटु ऊर्फ सिनु मुल्ला गावडे रा. भंगाराम पेठा ता. अहेरी असे असुन, यातील ४ आरोपींना घटनास्थळावरुन जवानांकडुन पकडण्यात आले असुन, मौजा भंगाराम पेठा येथील रहीवासी असलेला १ आरोपी नामे- छोटु मुल्ला गावडे फरार आहे. फरार आरोपीचा गडचिरोली पोलीस दलाकडुन कसुन तपास करण्यात येत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोली जिल्हयामध्ये नक्षलवादी घातपाती हिंसक कारवाया करण्यासाठी विविध प्रकारच्या बनावटी शस्त्र व स्फोटक साहीत्याचा वापर करतात. नक्षल समर्थकांकडुन जप्त करण्यात आलेल्या कार्डेक्स वायरद्वारे नक्षली बनावटीचे बीजीएल, हँडग्रेनेड, बॉम्ब आणि आयईडी तयार करण्यासाठी मोठया प्रमाणात वापर केला जातो. येत्या टिसीओसी सप्ताह दरम्यान सदर स्फोटकांचा नक्षलवाद्यांकडुन मोठया प्रमाणात वापर केला जाणार होता.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे (अभियान), अपर पोलीस अधीक्षक समीर शेख (प्रशासन) तसेच उपविभागिय पोलीस अधिकारी जिमलगट्टा सुजितकुमार क्षीरसागर यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि सचिन घोडके प्रभारी अधिकारी उपपोस्टे दामरंचा यांचे नेतृत्वात पार पडली.

सदर कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी अभियानात सहभागी असलेल्या जवानांचे कौतुक केले आहे. तसेच नक्षलवाद्यांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करणा­या नक्षलसमर्थकांवर कडक कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या आहेत.

हे देखील वाचा  :

धक्कादायक! युवकाचा गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

देशसेवा बजावत असतांना राष्ट्रीय रायफलचे जवान रोहित चव्हाण यांना वीरमरण

भारत आणि UAE मध्ये सर्वात मोठा करार, दहा लाख जणांना रोजगार देण्याचा दावा

 

 

 

 

Comments are closed.