Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आष्टी-इल्लूर जि. प. क्षेत्राचा सर्कल मेळावा संपन्न

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

आष्टी, दि. २० फेब्रुवारी : भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली च्या वतीने आष्टी-इल्लूर जिल्हा परिषद सर्कल चा कार्यकर्ता मेळावा आज दि. २० फेब्रुवारी रोजी भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय सरचिटणीस तथा खा. अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी होळी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

यावेळी मेळाव्याला प्रामुख्याने भाजपचे ज्येष्ठ नेते तथा ओबीसी मोर्चा चे पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख बाबुरावजी कोहळे, भाजपचे जिल्हा महामंत्री रवींद्रजी ओलालवार, आदिवासी मोर्चा चे प्रदेश सरचिटणीस प्रकाशजी गेडाम, चामोर्शीचे तालुका अध्यक्ष दिलीपजी चलाख, भाजपचे माजी जिप सदस्य प्रकाशजी कुकुडकर व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या मेळाव्यात शक्ती केंद्र प्रमुख व बूथ प्रमुखांना आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत घवघवीत यश संपादन करण्यासाठी नियोजन करून, परिश्रम घेऊन बूथ मजबूत करण्यासाठी व शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्य जनतेपर्यन्त पोहचविण्यासाठी कामाला लागण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. या मेळाव्याला तालुक्याचे सर्व पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

नक्षलवाद्यांना स्फोटक साहित्य पुरवठा करणारे ४ आरोपी पोलिसांच्या ताब्यात तर १ आरोपी फरार

धक्कादायक! युवकाचा गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

देशसेवा बजावत असतांना राष्ट्रीय रायफलचे जवान रोहित चव्हाण यांना वीरमरण

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.