Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! युवकाचा गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

आलापल्ली, दि. २० फेब्रुवारी :  आलापल्ली येथील वॉर्ड क्रमांक १ मधील एस.पी.गेस्ट हाउस च्या मागे एका युवकाचा मृतदेह  सागवाणच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. ही घटना आज सकाळी ६.०० वाजताच्या सुमारास उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मृत युवकाचे नाव कालिदास तालेवार (२७ ) असे आहे. मृत युवक हा मजुरीचे काम करत होता. या आत्महत्येच नेमकं कारण अद्याप कळू शकले नाही.  पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होईल.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

घटनेची माहिती प्राप्त होताच अहेरी पोलीसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून मृतकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

देशसेवा बजावत असतांना राष्ट्रीय रायफलचे जवान रोहित चव्हाण यांना वीरमरण

भारत आणि UAE मध्ये सर्वात मोठा करार, दहा लाख जणांना रोजगार देण्याचा दावा

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.