Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आरोग्य विभागाच्या परीक्षेची आधीची पद्धत चुकीची, नवीन परीक्षा पद्धत वापरून लवकरच उर्वरीत ५० टक्के रीक्त जागा भरणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

जालना, दि. २० फेब्रुवारी :  राज्याच्या आरोग्य विभागातील रिक्त जागांमुळे आरोग्य विभागाची स्थिती दयनीय होती.मात्र मोठ्या मेहनतीने ५० टक्के जागा भरल्यामुळे आता आरोग्य आरोग्य विभागात चांगली सेवा मिळू लागली आहे. मात्र चुकीच्या परीक्षा पद्धतीमुळे आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यामुळे राहिलेल्या ५० टक्के जागा गडबड होणार नाही अशी नवीन परीक्षा पद्धत वापरून लवकरच भरणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय.जालन्यातील मत्स्योदरी महाविद्यालयाच्या सभागृहात आज महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या वतीने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा राज्यातील उत्कृष्ट कोरोना योध्दा म्हणून सत्कार करण्यात आला,यावेळी ते बोलत होते.

आधीची परीक्षा पद्धत चुकीची असल्यानं हा प्रकार आरोग्य विभागाच्या परीक्षेदरम्यान घडला.मात्र आता नवीन पध्दतीने परीक्षा लवकरच घेतल्या जातील असंही टोपे यांनी स्पष्ट केलं.राज्यातील आरोग्य विभागात काम करणाऱ्या डॉक्टरांसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. अशी माहिती देखील टोपे यांनी दिली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

पुणे ते महू भीमज्योत मशाल यात्रेचे महू येथे जोरदार स्वागत

अहेरी विधानसभेत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला मोठा धक्का : आ. धर्मरावबाबा आत्राम यांचे खंदे समर्थक शैलेश पटवर्धन यांचा आ.वि.स. मध्ये जाहीर प्रवेश..

नक्षलवाद्यांना स्फोटक साहित्य पुरवठा करणारे ४ आरोपी पोलिसांच्या ताब्यात तर १ आरोपी फरार

 

 

 

Comments are closed.