Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

तोंडावर स्प्रे मारून तरुणीचे अपहरण करुन पाच जणांनी केला सामूहिक अत्याचार

पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली तर दोन जण फरार आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वृत्तसंस्था,दि,१७ ऑक्टोबर : तोंडावर स्प्रे मारून एका तरुणीचे अपहरण करून सामूहिक अत्याचार केल्याची घटना बिहार येथे घडली आहे. या प्रकरणातील तीन जणांना अटक करण्यात आली असून दोन जण अद्यापही फरार आहेत.

सदर घटना ही बिहारच्या औरंगाबाद येथे घडली आहे . औरंगाबाद जिल्ह्यातील मदनपुर तालुक्यात ही  पिडीत तरुणी राहते आहे . आपल्या शेजारच्या घरी जात असताना तिच्या मार्गावर असलेल्या पाच जणांनी तिच्या तोंडावर स्प्रे मारला आणि तिला बेशुद्ध केलं .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यानंतर बेशुद्ध अवस्थेतच तिचं अपहरण करून तिला एका निर्जन ठिकाणी नेण्यात आलं आणि तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला . या दरम्यान तरुणीला शुद्ध आली आणि ती सुटकेसाठी आक्रोश करू लागली पण, त्यांना तिच्यावर दया आली नाही.

पिडीतेवर अत्याचार केल्यानंतर या पाचही जणांनी तिची हत्या करण्याच्या हेतूने तिला अर्धमेल्या अवस्थेत गाडीत टाकुन घेऊन जात असताना वाटेत असलेल्या पोलिसांना गाडी विषयी संशय आला आणि गाडीचा पाठलाग  करून गाडी ताब्यात घेतली असता गाडीची तपासनी  दरम्यान पोलिसांना  एक तरुणी  बेशुद्धावस्थेत दिसून आली त्यावेळी पोलिसांनी त्या पीडित तरुणीची सुटका करून गाडीतील  तीन जणांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या तर दोन जण फरार झाले आहेत त्यांचा शोध घेत असून पीडित तरुणीला  रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा,

पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून चार महिलांवर अत्याचार करणाऱ्या भोंदू बाबाला अटक

वाघाने इसमावर हल्ला करून केले गंभीर, जंगलात बसून सिंधी तोडत असतांना घडली घटना.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पदभरतीबाबत 2869 उमेदवारांच्या तक्रारी; नाशिकमध्ये संचालकांनी केले शंका निरसन

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.