Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून चार महिलांवर अत्याचार करणाऱ्या भोंदू बाबाला अटक

विरार मधल्या भोंदू बाबाचा अघोरी प्रकार अर्नाळा सागरी पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा तीनकडे सोपविण्यात आले.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

विरार दि,१७ ऑक्टोबर : पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून चार महिलांवर अत्याचार करणाऱ्या एका भोंदू बाबाला विरार येथील अर्नाळा सागरी पोलिसांनी अटक केली असून आतापर्यत फसवणूक झालेल्या चार  अत्याचारित महिला पुढे आल्या आहेत. यामधील दोन पीडित महिला मुकबधीर आहेत.यामुळे भोदुबाबा दुर्बल घटकांना निशाना करताना पुन्हा एकदा समोर आले.

विरार मध्ये राहणाऱ्या २६ वर्षीय  पिडीत महिलेला आर्थिक अडचण भेडसावत होती. जुलै महिन्यात पिडीताच्या  परिचयाच्या दिनेश देवरुखकर या व्यक्तीने तिला मॅथ्यू पंडियन या बाबाची माहिती दिली. हा बाबा मंत्र आणि पूजा करून आर्थिक अडचण दूर करतो असे देवरुखकर याने पीडित महिलेला पटवून दिले होते. त्याला बळी पडून पीडित महिला विरार येथे बाबा राहत असलेल्या एका घरात गेली. पूजेसाठी पंडियन याने तिच्याकडून दहा हजार रुपये घेतले. पूजेनंतर कोट्यवधी रुपयांच्या पैशाचा पाऊस पडेल असे भोदूबाबाने पीडित महिलेला सांगितले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यानंतर पूजेच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार केला. असाच प्रकार त्याने पीडित महिलेच्या सोबत असलेल्या अन्य तीन मैत्रिणीं सोबत केला. त्यांच्याकडूनही पैसे घेऊन त्यांच्यावर नैसर्गिक आणि अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी कुठे वाच्यता केली तर जादूने संपूर्ण कुटुंबाला ठार करेन, अशी धमकीही दिली होती. जुलै ते ऑगस्ट या तीन महिन्यात बाबाने अनेक वेळा या महिलांवर अत्याचार केल्याचे पीडित महिलेच्या पतीने सांगितले.

भोंदू बाबा यांच्या कडून फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर या चारही पीडित महिलांनी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारी वरून पोलिसांनी दिनेश देवरुखकर तसेच भोंदू बाबा मॅथ्यू पंडियन याच्या विरोधात बलात्कारासह महाराष्ट्र नरबळी, अनिष्ट आणि अघोरी प्रथा व जादू टोणा अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा तीनकडे सोपविण्यात आला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सदर या बाबाने अनेक महिलांची आर्थिक आणि शारीरिक फसवणूक केल्याचा अंदाज असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पैशांचा पाऊस पाडून २६० कोटी रुपये मिळवून देणारा असल्याचा दावा या बाबाने केल्याचे तक्रारीत म्हटले आहे..

हे देखील वाचा,

वाघाने इसमावर हल्ला करून केले गंभीर, जंगलात बसून सिंधी तोडत असतांना घडली घटना.

रत्नाकर गायकवाड यांनी लिहलेल्या गोयंका गुरुजीवरील पुस्तकांचे डॉ.शा.ब.मुजुमदार यांच्या हस्ते प्रकाशन.

घरगुती भांडणातून पतीने कुऱ्हाडीने केला पत्नीवर वार..पत्नी गंभीर जखमी .आरोपी ताब्यात.

Comments are closed.