Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

घरगुती भांडणातून पतीने कुऱ्हाडीने केला पत्नीवर वार..पत्नी गंभीर जखमी .आरोपी ताब्यात.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली.दि,16 ऑक्टोबर :- अहेरी तालुक्यात येत असलेल्या आलापल्ली शहरातील भामरागड मार्गावर असलेल्या मनेवार वार्डात काल रात्री  दि,15 ऑक्टोबर रोजी  दसऱ्याच्या दिवशीं 7:30  वाजताच्या सुमारास किरकोळ  वाद निर्माण झाले .त्यानंतर घरगुती वादाचे रूपांतर मोठ्या घटनेत झाले.या झालेल्या वादातून पतीने पत्नीवर कुर्‍हाडीने चक्क डोक्यावर वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.

जखमी पत्नीचे नाव ओमदेवी सतीश डोके (25) नाव असून  प्रकृती गंभीर असल्याने उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले असल्याची माहिती आहे.  सदर घटनेची माहिती पोलीस विभागाला मिळताच आरोपी पती सतीश डोके याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून   कलम 307 अनव्ये गुन्हा दाखल केला आहे. अद्याप अटक करण्याची प्रकिया सुरू असल्याची माहिती अहेरी पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक श्याम गव्हाणे यांनी दिली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

काल दि,15 ऑक्टोबरच्या रात्री च्या सुमारास आपल्या सासरी पत्नीसह राहणाऱ्या सतीश डोके त्याची पत्नी ओमदेवी सोबत घरगुती कारणावरून भांडण झाले यात रागाच्या भरात आरोपीने पत्नीच्या डोक्यावर कुऱ्हाडीने 3 ते 4 वार केले त्यामुळे प्रचंड प्रमाणात रक्तस्राव झाला. काल दसऱ्याच्या निमित्ताने आजूबाजूचे लोक दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यात व्यस्त असताना घडलेल्या या घटनेने आलापल्ली शहर हादरले आहे.

घटनेची माहिती टायगर चॅरिटेबल ट्रस्ट ला होताच क्षणाचाही विलंब न करता ट्रस्ट चे साई तुलसिगरी यांनी लागलीच रुग्णवाहिकेद्वारे जखमी ओमदेवीला अहेरी उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने ओमदेवीला आधी चंद्रपूर नंतर नागपूर ला उपचारासाठी हलविण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. .घटनेचा अधिक तपास अहेरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

  • हे देखील वाचा,

Comments are closed.