Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉइज शाखाच्या वतीने अभ्यासिकेला पुस्तक संच भेट

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली दि,15 ऑक्टोबर : दसरा आणि धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका येथे असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉइज शाखा गडचिरोलीच्या वतीने अभ्यासिका निर्माण करण्याचा उद्देश होता त्याकरिता अधिकारी कर्मचारी सुशिक्षित वर्गाच्या पे बॅक टू सोसायटी जाणिवेतून सहयोग राशी जमा करून स्पर्धा परीक्षा पुस्तक संच व कपाट भेट म्हणून देण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अभ्यासिका गडचिरोली येथील विध्यार्थी यांना स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीकोनातून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी विविध पुस्तकांची आवश्यकता असते.त्याअनुषंगाने विध्यार्थी यांना त्याचा उपयोग होईल. विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनापासून अभ्यासिका जॉईन करून जास्तीत जास्त पुस्तके वाचावे, व ध्येय गाठावे व स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विध्यार्थी यांनी अभ्याशिकेचा लाभ घ्यावा असे मा.गरड सरांनी आपल्या अध्येक्षीय मनोगातून सांगितले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा


यावेळी कार्यक्रमात सुरेंद्र गरड,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग प्रमुख गडचिरोली, सोनल भडके सहाय्यक वनसंरक्षक गडचिरोली, मनिष गणवीर प्रकल्प अधिकारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षन संस्था बार्टी गडचिरोली, देवेंद्र मेश्राम अभ्यासिका संचालक तसेच मा. चंदुभाऊ बावनवाडे, महेंद्र गावंडे,सिद्धार्थ मेश्राम, राजू कोडापे, गुरू वाढई, रुपेश मेश्राम, युवराज मडावी, मिथुन राऊत , राहुल मेश्राम, तसेच असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉइज शाखा गडचिरोली चे सर्व सदस्य गण डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका येथील विध्यार्थी उपस्थित होते.

आज घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉइज शाखाच्या( APEM) चे सदस्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन धर्मराव दुर्गमवार यांनी केले तर आभार भारत अल्लीवार यांनी केले.

हे देखील वाचा,

Comments are closed.