Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वाघाने इसमावर हल्ला करून केले गंभीर, जंगलात बसून सिंधी तोडत असतांना घडली घटना.

वाघांचे हल्ले टाळण्यासाठी वनविभागाकडून वाघ सनियंत्रण पथकामार्फत विविध सूचना केल्या जात असले तरी स्थानिक नागरिक अक्ष्यम्य दुर्लक्ष करत आहेत..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

 गडचिरोली,वडसा वनविभागात वाघाचा वावर असून आज पर्यंत १५ नागरिकांचा जीव वाघाच्या हल्यात गेल्याने स्थानिक नागरिकांनी आंदोलन तसेच विरोधकांनी मुद्दा उचलून धरला होता.त्यावेळी वाघांना जेरबंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते .त्यानतर वाघाला जेरबंद करण्यासाठी  विविध वनविभागाच्या पथक येवून जवळपास महिनाभर पाळत ठेवली मात्र सदर नरभक्षक वाघ हाती न लागल्याने जेरबंद करण्यासाठी आलेली सर्व पथके वापस गेली. त्यानंतर गडचिरोली वनवृताचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांच्या मार्फत वनाधिकार्याना सूचना देवून वनकर्मचाऱ्या मार्फत पुन्हा वाघाचे हल्ले टाळण्यासाठी वनविभागाकडून वाघ सनियंत्रण पथकामार्फत विविध सूचना केल्या आहेत. जंगलात जाऊ नये अशी दवंडीही दिली आहे. पिपल फॉर एन्वारमेंट अँड अंडनिमल या संस्थेने सिंधी तोडण्यासाठी जात असलेल्या नागरिकांनी कशी काळजी घ्यावी याबाबतही जनजागृती केली आहे. मात्र  दिलेल्या सूचनांकडे स्थानिक नागरिक अक्ष्य्म दुर्लक्ष केल्याने अशा घटना घडत आहेत. विशेष म्हणजे जखमी लालाजी हे बोदलीपासून २ ते २.५ किलोमीटर अंतरावर असलेल्या कुकुडरांजी व्याप्त दाट जंगलात (कक्ष क्रमांक १७९) मध्ये  बसून सिंधी तोडत होते. त्यामुळेच वाघाने त्यांच्यावर हल्ला करण्याची हिंमत केली असल्याचे वनाधिकार्यांच्या तपासात निष्पन झाले.

गडचिरोली दि,१७ ऑक्टोबर : गडचिरोली वनपरिक्षेत्रात येत असलेल्या बोदली बिटामध्ये सिंधी कापण्यासाठी गेलेल्या इसमावर वाघाने अचानक हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली. या हल्ल्यात त्या इसमाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. लालाजी मारोती मोहुर्ले (५०) असे जखमी इसमाचे नाव आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मिळालेल्या माहितीनुसार, लालाजी यांच्यासह बोदली गावातील ७ इसम बोदलीपासून २ ते २.५ किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलात (कक्ष क्रमांक १७९) सिंधी आणण्यासाठी गेले होते. १२.३० वाजताच्या सुमारास लालाजी यांच्या आरडाओरड करण्याचा  अचानक आवाज  सहकार्यांच्या कानी पडला त्यावेळी सोबत गेलेल्यानीही लोकांनीही आरडाओरड करत लालाजी यांच्याकडे  धाव घेतल्याने  वाघाने लालाजी यांना सोडून जंगलात पळून गेला असला तरी वाघाने गंभीररित्या जखमी केले. यात लालाजी यांच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले.

सदर घटनेची माहिती मिळताच गडचिरोलीचे उपवनसंरक्षक डॉ.कुमारस्वामी यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक, सोनल भडके, वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम, क्षेत्र सहायक श्रीकांत नवघरे, वनपाल वैभव रामणे, वाघ नियंत्रण पथकाचे वनपाल किरमे, बिट वनरक्षक भसारकर, तसेच राजू कोडापे, धर्मराव दुर्गमवार, गौरव हेमके, साई टेकाम आदी वनरक्षकांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच प्रत्यक्षदर्शीकडून माहिती जाणून घेतली. घटनास्थळी केलेल्या पाहणीत वाघाच्या पाऊलखुणा आढळल्या आहेत. अधिक चौकशी उपवनसंरक्षक डॉ.कुमारस्वामी आणि सहायक वनसंरक्षक भडके यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम करीत आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा,

रत्नाकर गायकवाड यांनी लिहलेल्या गोयंका गुरुजीवरील पुस्तकांचे डॉ.शा.ब.मुजुमदार यांच्या हस्ते प्रकाशन.

Comments are closed.