Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली ब्रेकिंग: अन्नपुरवठा निरीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

कुरखेडा तहसील कार्यालयातील घटना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

कुरखेडा, दि. १५ डिसेंबर: तालुक्यातील एका महिलेला  मोबाईलवर सतत मॅसेज करून महिलेचा पाठलाग करणाऱ्या कुरखेडा येथील तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा निरीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ माजली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कुरखेडा येथील तहसील कार्यालयात कार्यरत असलेले सर्कल अन्नपुरवठा निरीक्षक उमाकांत वालदे हे त्यांच्या   मोबाईलवरून  रेशनदुकानदार असलेल्या एका महिलेच्या मोबाईलवर  वारंवार मॅसेज करून पाठलाग करीत असल्याची तक्रार  सदर पीडित महिलेने कुरखेडा पोलीस स्टेशन ला आज केली .या  तक्रारीवरून कुरखेडा पोलिसांनी  भांदवी ३५४(ड) नुसार अन्न पुरवठा निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा अधिक तपास पीएसआय शीतल माने करीत आहे.

Comments are closed.