Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

तब्बल 10 किलो सोन्यासह रोख रक्कमही पोलिसांनी केले जप्त

अमरावतीत राजापेठ पोलिसांची मोठी कारवाई.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

अमरावती, दि. ६ मार्च :  अमरावती शहरातील राजापेठ पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास दसरा मैदान येथील एका अपारमेंट मध्ये धाड टाकली यात राज्यस्थान येथील तीन युवकाकडून तब्बल पाच कोटी रुपये किमतीचे १०किलो सोने, पाच लाख ३९ हजार रुपये रोख असा एकूण५कोटी ५ लाख रुपयांचे वर ऐवज जप्त करण्यात आला आहे.

राज्यस्थान येथील तिन्ही युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे, तर त्यांचे कडून कटर सह कच्च्या चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या असून त्यांचे कडून ठोस कागदपत्रे मिळून न आल्याने संशयास्पद पोलिसांना वाटत आहे त्यामुळे इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली असून पुढील तपास राजापेठ पोलीस करीत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे तिन्ही युवक गेल्या चार वर्षांपासून अमरावतीतच राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून हे सोने चोरीचे आहे की हवाला मार्गाचे आहे याचा शोध पोलीस घेत आहे मात्र इतकं सोनं सापडल्याने अमरावती जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

येत्या काही दिवसात 70 रेल्वे स्टेशनला विमानतळाचं स्वरुप प्राप्त होणार – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे

अनैतिक संबंधातून प्रियकराने केला प्रियसीच्या पतीचा खून…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.