Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक!! मोठ्या भावाने आपल्या लहान मतिमंद भावाची गळा दाबून केली हत्या!

गोंदिया जिल्हातील आमगाव पोलीस स्टेशन अंतर्गत शिवनी येथील घटना. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गोंदिया, दि. २० डिसेंबर : गोंदिया जिल्हात मोडत असलेल्या आमगाव पोलीस स्टेशन अंतर्गत शिवनी येथे आईने आल्या मोठ्या मुलाला नवीन गाडी घेण्यास पैसे दिले नाहीत, हा राग मनात घेऊन मोठया भावाने चक्क आपल्या लहान मतिमंद भावाचा गळा दाबून हत्या केल्याची घटना घडली आहे.

हेमंत डोये  (२३) याला गाडी घेण्यासाठी पैसे पाहिजेल होते. त्यासाठी त्याने आपल्या आईजवळ हट्ट धरला होता, परंतु हेमंतची आई छगनबाई डोये (५०) यांनी हेमंतचा लहान भाऊ भुवन डोये (१९) हा मतिमंद असल्याने त्याच्यावरती वैद्यकीय उचारास खर्च जास्त होत असल्याचे सांगून आता पैसे नाहीत असं सांगंत आईने नवीन गाडी घेण्यासाठी पैसे देण्यास हेमंतला नकार दिला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मात्र भावाला वैद्यकीय उपचारासाठी पैसे लागतात म्हणून आई मला पैसे देत नाही. आणि त्या भावामुळे मला नवीन गाडी घेता येत नाही हा राग हेमंतने मनात ठेवला आणि त्याने या रागाच्या भरात हेमंत याने आपल्या आईसोबत कडाक्यांचे भांडण केले “मी तुला आज मारून टाकीन” अशी धमकी आपल्या आईला दिली होती. या मुलाच्या धमकीला घाबरुन आई बाजूच्या घरी झोपायला गेली. मात्र नराधम हेमंतने १९  वर्षीय मतिमंद असणाऱ्या भुवन डोये या भावाची दि. १८ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास गळा दाबून हत्या केली. दरम्यान ही धक्कादायक घटना १९ डिसेंबर रोजी सकाळी उघड झाल्याने परिसरात एकच खळबळ माजली. आमगांव पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Exclusive Report .. “त्या ” अवैध उत्खनन प्रकरणी जप्त केलेल्या दोन पोक्लेन मशीनला दुसऱ्या ठीकाणी हलविताच वन विभागाने मोठ्या शिताफीने शोधून पोक्लेन मशीन घेतले आपल्या ताब्यात

दोनच चोर चार पोलिसांवर पडले भारी! धावत्या गाडीमध्ये पोलिसांवर हल्ला करून गुन्हेगारांचे पलायन

भारतीय कृषी संशोधन संस्थेत ६४१ जागांसाठी भरती

 

 

 

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.