Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

Exclusive Report .. “त्या ” अवैध उत्खनन प्रकरणी जप्त केलेल्या दोन पोक्लेन मशीनला दुसऱ्या ठीकाणी हलविताच वन विभागाने मोठ्या शिताफीने शोधून पोक्लेन मशीन घेतले आपल्या ताब्यात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

ओमप्रकाश चुनारकर, सचिन कांबळे

गडचिरोली, दि. १९  डिसेंबर : आलापल्ली वन विभागातील पेरमिली वनपरिक्षेत्रात मिरकल ते सकीनगट्टा रस्त्याच्या कामासाठी दोन पोकलेन मशीन द्वारे अवैधरित्या मुरूम उत्खनन होत असल्याची माहिती वन विभागाला मिळताच वनविभागाचे वनाधिकारी व वन कर्मचारी घटनास्थळी पोहोचून शुक्रवारी दि. १७ डिसेंबर रोजी दोन पोकलेन मशीन जप्त करण्यात आले होते. परंतु  कंत्राटदारानी जप्त केलेल्या दोन पोकलेन मशिनी रातोरात घटनास्थळावरून हलविल्याची माहिती वन विभागाला प्राप्त होताच सदर घटनेची माहिती गडचिरोली वनवृतांचे मुख्य वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांना दिली त्यावेळी तत्काळ वन गुन्हा नोंद असल्याने तहसीलदार अहेरी,पोलीस ठाणे अहेरी येथे तक्रार दाखल करूण्याचे आदेश देताच त्यांच्या मार्गदर्शनात राहुल सिह टोलिया उपवनसंरक्षक आलापल्ली,नितेश देवगडे वनाधिकारी वनाधिकारी तसेच सिरोंचा वन विभागाच्या वनाधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांनी काही तासातच शोध मोहीम राबवून ४५ किलोमीटर अंतर गाठलेल्या जिमलगट्टा परिसरातून दोन्ही ही पोक्लेन शोधून काढली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यामुळे वनाधिकाऱ्यांनी मोठ्या कंत्राटदाराविरुद्ध केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे, या शिवाय सदर कंत्राटदारानी जप्त केलेल्या पोकलेंड इतरत्र हलविल्याने वनाधिकाऱ्यांना जवळपास ३०० कर्मचाऱ्यांना शोध मोहिमेत लावल्याने चांगलाच मनस्ताप झाला आहे. त्यामुळे वन विभाग सदर कंत्राटदारावर काय कारवाई करतात याकडे सर्व कंत्राटदारासह नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 

काय आहे अवैध मुरूम उत्खनन प्रकरण..

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आलापल्ली वन विभागातील पेरमिली वनपरिक्षेत्रात मिरकल ते सकीनगट्टा रस्त्याचे काम चालू असून त्या रस्त्याच्या कामासाठी दोन पोकलेन मशीन द्वारे अवैधरित्या मुरूम उत्खनन करीत असल्याची गुप्त माहिती आलापल्ली वनविभागाचे उप वनसंरक्षक राहुल सिंह टोलीया यांना प्राप्त झाली असता. त्यांनी नियोजनबद्ध अवैध उत्खनन प्रकरणाची चौकशीसाठी अलापल्लीचे सहाय्यक वनाधिकारी नितेश देवगडे व वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर व आदी वन कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पोहचून चौकशी करायला लावली. चौकशी दरम्यान रस्त्यावर टाकत असलेली मुरूम ही आरक्षित वनातुन अवैध उत्खनन करीत असल्याचे समोर आले ,

त्याचवेळी घटनस्थळी उपस्थित कंत्राटदारांच्या कामगारांना विचारणा करण्यात आली असता उडवाउडवीचे उत्तर देत स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने विरोध करू लागले. सदर भाग अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त असल्याने वन अधिकाऱ्यांनी मोका पंचनामा करून जप्त केले व दोन पोकलेनची चावी आणि बॅटरी घेऊन वन गुन्हा नोंद करून आलापल्ली येथील वन कार्यालयात बोलावण्यात आले होते. मात्र वन अधिकाऱ्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवत  कंत्राटदारांनी रातोरात सदर दोन्ही पोकलेन घटनास्थळापासून जप्त केल्या ठिकानाहून हलविले असता वन विभागाच्या वनाधिकारी ,पोलीस तसेच महसूल मंडळाच्या सहाय्याने ४५ किलोमीटर अंतरावर जिमालगट्टा परिसरातुन दोन ही पोकलेन ला शोधून काढण्यात आले.

पोकलेन जप्त करण्यासाठी वनविभागाने अशी आखली योजना.

वनविभागाचे वनाधिकारी व वनकर्मचारी शुक्रवारी दिनांक १७ डिसेंबर रोजी सदर घटनास्थळी पोहोचून चौकशी केली असता त्याठिकाणी मिरकल ते सकीनगट्टा रस्त्याचे काम सुरु असून त्याठिकाणी दोन पोकलेन मशीनद्वारे अवैधरित्या वनातील मुरूम उत्खनन करीत असल्याचे प्रत्यक्ष आढळून आले. मात्र घटनास्थळी पोक्लेन जप्त करून तिथेच ठेवून गेले असता घटनास्थळी जप्त केलेली दोन पोकलेन मशीन घटनास्थळावरून मुजोर कंत्राटदरानी दि १७ डिसेंबर च्या मध्यरात्री हलविण्यात आल्याची गोपनीय माहिती १८ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास वनाधिकाऱ्यांना प्राप्त झाली. घटनास्थळी जाऊन चौकशी केल्यानंतर जप्त केलेले दोन पोकलेन घटना स्थळी उपलब्ध नसल्याने वनाधिकाऱ्यांनी गडचिरोली वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांना माहिती दिली.

त्याचवेळी गडचिरोली वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी क्षणाचाही विलंब न करता मोठ्या शिताफीने सापडा रचून  कंत्राटदाराचे मुसक्या आवळण्यासाठी राहुलसिंग टोलीया उपवनसंरक्षक अलापली, उपवनसंरक्षक सिरोंचा यांना आदेश देत अधिनस्त असलेल्या अधिनस्त सर्व वनाधिकारी कर्मचाऱ्यांना तसेच तहसीलदार अहेरी, पोलीस ठाणे अहेरी यांना तक्रार करून सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचा समवेत जप्त करण्यात आलेल्या पोकलेन मशीनचे शोधकार्य सुरु केले.

मोका स्थळापासून ४५ किमी अंतरावर आढळून आले दोन पोकलेन मशीन.

सर्व वनाधिकारी कर्मचाऱ्यांनी जंगल गस्ती करून चप्पा चप्पा शोधमोहीम राबवली असता मोका स्थळापासून ४५ किमी अंतरावर जिमलगट्टा क्रासींग पासून लंकाचेन या गावानजीकच्या रस्त्यावर आलापल्ली- सिंरोंचा मुख्य मार्गा पासुन २०० किमी अंतरावर दोन पोकलेन मशीन आढळून आल्याने वन विभागाच्या पथकाने दोन्ही पोकलेन मशीन ताब्यात घेतले आहे.वन विभागाच्या चौकशीअंती दोन पोकलेन मशीन घटना स्थळावरून कंत्राटदारांनी सक्कीनगट्टा गावातून वन रस्त्यामधून कोत्तागुडम-पत्तीगाव- खांदला- राजाराम-गोलाकर्जी ते जिमलगट्टा क्रासींग पासून लंकाचेन रस्त्यावर हलविल्याचे स्पष्ट झाले.

वन विभागाच्या सदर कारवाईसाठी या अधिकाऱ्यांना घ्यावे लागले अथक परिश्रम,

सदर अवैध उत्खनन प्रकरणाची कारवाई उपवनसंरक्षक राहुल सिंह टोलीया, उपविभागीय वन अधिकारी नितेश शंकर देवगडे, उपविभागीय वन अधिकारी सुहास बडेकर, प्रकाष्ठ निस्कासन अधिकारी प्रदीप बोधनवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर यांनी पार पाडली.पथकात वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीन लेले, वनपरिक्षेत्र अधिकारी मुक्तेश्वर घोनाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी सुमीत निर्मल, वनपरिक्षेत्र अधिकारी आरती मडावी, वनपरिक्षेत्र अधिकारी चौके, वनपरिक्षेत्र अधिकारी नगराळे, तसेच चामोर्शी, घोट, मार्कंडा, अहेरी, पिरमीली, आलापल्ली, रेपनपल्ली,कमलापुर, जिमलगट्टा परिक्षेत्रातील वनरक्षक व वनपाल सहभागी झाले होते.तहसीलदार कार्यालय अहेरी च्या वतीने सदर कार्यवाही नायब तहसीलदार खोत व त्यांच्या अधिनीस्त तलाठी, मंडळ अधिकारी यांनी कार्यवाही यशस्वी करण्यास सहकार्य केले.

हे देखील वाचा : 

दोनच चोर चार पोलिसांवर पडले भारी! धावत्या गाडीमध्ये पोलिसांवर हल्ला करून गुन्हेगारांचे पलायन

गोंडवाना विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यापीठातील संपूर्ण कामकाज ठप्प

 

 

ओबीसी आरक्षणासाठी शेकाप राज्यव्यापी आंदोलन उभे करणार : भाई रामदास जराते

 

 

 

Comments are closed.