Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक!! प्रेयसीने लग्नासाठी लावला तगादा अन् प्रियकराने उचलले टोकाचे पाऊल!

लग्नासाठी तगादा लावणाऱ्या प्रेयसीला केटामाईन या अंमली पदार्थाचे विषारी इंजेक्शन देऊन तिची हत्या करणाऱ्या चंद्रकांत गायकर (३५) या प्रियकराला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

रायगड, दि. १ जून :  जिल्ह्यातील नवीन पनवेल शहरातील विमानतळाच्या जागेत काही दिवसांपूर्वी एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही तासांतच मृत तरुणीची ओळख पटवून हत्येचं कारण स्पष्ट केले आहे.

मृत तरुणीने लग्नाचा तगादा लावल्यामुळे प्रियकर तरुणाने केटामाईन  नावाचं इंजेक्शन देऊन तिची हत्या केल्याचं पोलीस चौकशीत उघड झालं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली असून न्यायालयाने त्याला ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Ketamine-Hydrochloride-Injection-USP
           Ketamine-Hydrochloride-Injection-USP

या घटनेतील मृत  महिला पनवेलमधील असून सहा महिन्यापुर्वी तिचा पाय फ्रॅक्चर झाल्याने ती उपचारासाठी पटेल हॉस्पीटलमध्ये गेली असतांना तिची हॉस्पीटलमधील वॉर्डबॉय चंद्रकांत गायकर याच्यासोबत ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबध सुरु झाल्यानंतर तिने चंद्रकांतच्या पाठीमागे लग्न करण्यासाठी तगादा लावण्यास सुरुवात केली होती.  मात्र तिला गंभीर आजार असल्याने चंद्रकांत तिच्यासोबत लग्न करण्यास टाळाटाळ करत होता.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्यामुळे ती चंद्रकांतच्या पाठीमागे लग्न करण्याचा आग्रह धरुन नेहमी त्याच्यासोबत वाद घालत होती. तसेच त्याला सतत धमकी देत होती. त्यामुळे तिच्या त्रासाला कंटाळुन चंद्रकांतने तिला विषारी इंजेक्शन देऊन तिची हत्या करण्याची योजना आखली. त्याने हॉस्पिटलमध्ये काम करत असताना मिळवलेल्या ज्ञानाचा वापर करून तिची केटामाईन इंजेक्शन देऊन हत्या केली.

त्यानंतर आरोपी प्रियकराने तिचा मृतदेह नवीन पनवेल शहरातील विमानतळाच्या जागेत असणार दत्त मंदिराजवळील एका रस्त्याच्या कडेला नेऊन टाकला. २९  मे रोजी रस्त्याच्या कडेला तरुणीचा मृतदेह आढळल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली होती. स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर चौकशीला सुरुवात केली. यावेळी हा मृतदेह नानोशी येथील रमेश ठोंबरे यांच्या बहिणीचा असल्याची माहिती समोर आली.

याप्रकरणी पोलिसांनी रमेशची चौकशी केली असता, आपल्या बहिणीचे वॉर्डबॉय चंद्रकांत गायकर याच्याशी प्रेमसंबंध असल्याची माहिती दिली. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाल्याची माहितीही रमेशने पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलिसांनी वॉर्डबॉय गायकर याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. केटामाईन इंजेक्शन देऊन हत्या केल्याचंही त्याने यावेळी सांगितलं आहे. आरोपी गायकर सध्या पोलीस कोठडीत असून पोलीस त्याची सखोल चौकशी करत आहेत.

हे देखील वाचा :

भाजप कार्यकर्त्याला बेदम मारहाण प्रकरणी जालन्यातील कदीम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन निलंबित

धक्कादायक!! आलापल्लीत राहत्या घरी महिलेचा आढळून आला मृतदेह!

मुलाच्या क्रिकेट प्रेमासाठी ५ एकरची द्राक्ष बाग काढून वडिलाने बनवले राष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान

 

Comments are closed.