Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

“वंशाला दिवा पाहिजे” ही मागणी करत, चक्क सासू-सासऱ्याने सुनेला मारहाण करून, चक्क भावाच्या मुलासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं.

पतीला समजताच घराबाहेर काढलं...पीडितेचा वनवास.. पतीला समजताच घराबाहेर काढलं. पीडितेचा वनवास. पोटातील गर्भाला नाव कुणाचं द्यावं.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

आपल्या कुळाचा, घराण्याचा वंश आणि वारसा हा फक्त मुलगाचं चालवू शकतो. यासाठी धांदाड विचारांनी आणि बुरसटलेल्या मानसिकतेने ग्रासलेले लोक, कधी काय करतील ? याचा नेम नाही… असाच काहीसा संतापजनक प्रकार बीड जिल्ह्यात उघडकीस आलाय.

बीड दि,११ ऑगस्ट : पोटच्या मुलाला मूल होणार नाही हे माहिती झाल्यानंतर, “वंशाला दिवा पाहिजे” ही मागणी करत, चक्क सासू-सासऱ्याने सुनेला मारहाण करून, चक्क भावाच्या मुलासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं. नात्याला काळिमा फासणाऱ्या घटनेने खळबळ उडाली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या विषयी पीडितेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे, की माझं विवाह गेल्या १५ वर्षांपूर्वी, आष्टी तालुक्यातील कडा परिसरात राहणाऱ्या मोठोबा भिसे यांच्याशी झाला आहे. आम्ही नंदीबैलाच्या माध्यमातून भीक्षा मागून कुटुंबाची उपजीविका भागवतो. २०१६ मध्ये माझ्या पतीसह सासू-सासर्‍यांनी, मला न सांगता अहमदनगर येथील देशपांडे हॉस्पिटल मध्ये टेस्ट ट्यूब बेबी करून घेतली आणि मला मुलगी झाली. मात्र त्यानंतर २०२० मध्ये माझ्या सासूने मला सांगितले, की ‘तुझा नवरा बाप होऊ शकत नाही “. मला यावर विश्वास बसला नाही, त्यामुळं मी माझ्या पतीला विचारून याची शहानिशा केली आणि त्यांनी देखील मला तेच सांगितलं.

त्यानंतर एक महिन्यानंतर माझे पती कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. याचाच फायदा घेऊन सासू म्हणाली, की “तुझा नवरा कधीच बाप बनू शकत नाही, त्यामुळे आपला वंश चालविण्यासाठी तुला एक मुलगा होणे गरजेचे आहे”. म्हणून मी जे सांगते ते ऐक व तसेच कर. “माझ्या भावाचा मुलगा देव यादव सोबत, तू शारीरिक संबंध ठेवून आम्हाला एक मुलगा दे”. त्या गोष्टीला मी नकार दिला असता माझ्या सासू-सासर्‍यांनी मला खूप मारहाण केली. त्यानंतरही मी नकार दिला मात्र सततच्या मारहाणीला आणि त्रासाला कंटाळून, नाईलाजास्तव मला होकार द्यावा लागला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पीडिताच्या नवऱ्याला हे सर्व कळताच  भावाला बोलवून पाठवलं माहेरी. पीडितेने फिर्यादीत म्हटलंय असं ..

३ जानेवारी २०२१ रोजी माझ्या सासू-सासर्‍यांनी देव यादव असणाऱ्या घरामध्ये मला बळजबरीने पाठवलं आणि दाराबाहेर थांबले. त्यानंतर अनेक वेळा माझी इच्छा नसताना, माझ्या सासू-सासऱ्यांचा दबावाखाली त्याने अनेक वेळा घरी येऊन माझ्यासोबत जबरदस्ती केली. यावेळी सासू घराबाहेर थांबत असे. “तर हे करण्यासाठी सासु देव यादवला खर्च पाण्यासाठी पैसेही देत असे”. त्यानंतर काही दिवसांनी मी गरोदर राहिल्याचे कळल्याने, ही गोष्ट मी माझ्या सासू सासर्‍यांसह नवर्‍याला सांगितली. हे ऐकून त्यानंतर सासू-सासर्‍यांनी मला हॉस्पिटलमध्ये देखील घेऊन गेले आणि त्यांनी पेढे देखील वाटप केले..मात्र या दरम्यान माझ्या नवऱ्याला हे सर्व कळलं आणि त्यांनी माझ्या भावाला बोलवून मला माहेरी पाठवलं.

एवढेच काय तर पिडीतेचा पती तिला नांदवत नसून या प्रकरणात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला आहे. मात्र पीडिता ही पाच महिन्यांची गरोदर आहे. त्यामुळे तिझ्यासमोर जगावं कसं हा प्रश्न निर्माण झाला आहे. वंशाला दिवा पाहिजे म्हणून सासू – सासऱ्यांनी हे कृत्य करण्यास भाग पाडलं. ती गरोदर राहिल्यावर पेढे वाटले, अनेकांना दारू पाजली. मात्र आज पोटात असणाऱ्या बाळाला, बापाचं नाव काय द्यावं. असा प्रश्न तिच्यासमोर निर्माण झाला आहे. एवढंच नाही तर आता आमच्या समाजातील लोक देखील उलटसुलट बोलत आहेत. जातीतून बाहेर काढायचं नाव घेत आहेत. त्यामुळे माझ्या माहेरी देखील मी कसा राहू. असा सवाल पीडितेने केला आहे.

अशा बुरसटलेल्या मानसिकतेत जगणार्‍या आणि नात्याला काळिमा फासणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई होणं गरजेचं असल्याचे मत नातेवाईकांनी केले..

या विषयी पीडितेचा भाऊ म्हणाला, की २ तारखेला आम्ही तक्रार केली आहे. आज १० तारीख उलटलीय तरी एकही आरोपी पोलिसांनी अटक केला नाही. आज समाज आम्हाला नाव ठेवतोय. तिचा नवरा तिला घरात घ्यायला तयार नाही. ज्याने हे केलंय तो मुलगा देखील तिला घरात घ्यायला तयार नाही. आणि असं असतांना हे मिटवण्यासाठी समाजातील लोक पैसे घ्या म्हणतात. पण पैसे घेऊन आम्ही काय करावं ? आज या पाच महिन्याच्या गर्भाला नाव कुणाचा द्यावं ? त्यामुळे समाज आणि सरकारने आम्हाला न्याय द्यावा ? अशी मागणी पिडीतेच्या भावाने केली आहे.
तर दुसरीकडे या विषयी तपासी अधिकारी मोबाईल पथकाच्या प्रमुख, पीएसआय राणी सानप म्हणाल्या की, आमचा तपास सुरू असून लवकरच आरोपींना आम्ही अटक करू. मात्र सध्या चुंबळी येथील मुलीच्या आत्महत्या प्रकारणात लक्ष देण्याचं वरिष्ठांनी सांगितलं आहे. त्यामुळं थोडा वेळ लागत आहे.
दरम्यान वंशाला दिवा पाहिजे म्हणून चक्क पोटच्या मुलाच्या बायकोसोबत, सासू-सासर्‍यांनी केलेल्या या कृत्याचा तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्याच बरोबर अशा बुरसटलेल्या मानसिकतेत जगणार्‍या आणि नात्याला काळिमा फासणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई होणं गरजेचं आहे. ज्याने करून पुन्हा या महाराष्ट्रात, एखाद्या महिलेसमोर आपल्या पोटातील गर्भाला नाव कुणाचं द्यावं हा प्रश्न पडणार नाही.

हे देखील वाचा,

सोलापुरातील सहाय्यक पोलिस आयुक्तांचा मृत्यू

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते बीकेसी येथे मियावाकी वनीकरणास सुरूवात!

पेरमिली येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.