Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जागेच्या वादावरून काठीने मारहाण झाल्याने उपसरपंचाचा मृत्यू…

भंडारालगत असलेल्या दवडीपारची घटना...

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

भंडारा, दि. २७ नोव्हेंबर : भंडारालगत असलेल्या दवडीपार येथे जागेच्या किरकोळ वादाचे रुपांतर विकोपला गेल्याने रागाच्या भरात लाठीने डोक्यावर वार केल्याने  उपसरपंचाचा मृत्यू झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे.

मृत झालेल्या उपसरपंचाचे नाव दिनेश बांते (३९) असून दवडीपार येथील रहिवासी आहे. याच गावातील वाद करणारे माजी पोलीस पाटील मदन मत्तेसह पाच मुलावर मारहाणीमध्ये मृत्यूचा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विशेष म्हणजे मृतक दिनेश बांते हा उपसरपंच असून शिवसेनेच्या विभाग प्रमुख सुद्धा आहे. बांते व मते यांच्यात घराच्या जागेचा वाद गत काही वर्षापासून सुरु होता. शुक्रवारी रात्री यावरुन पुन्हा वाद झाला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या वादत दिनेश बांतेच्या डोक्यावर काठीने प्रहार केल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना भंडाराच्या शासकीय रूग्णालयात आणले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी सहाही आरोपींना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून या घटनेने दवडीपार गावात एकच खळबळ उडाली आहे.

हे देखील वाचा : 

गडचिरोली ब्रेकिंग : नक्षल्यांनी केली दोन ट्रक्टरची जाळपोळ ..

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने गडचिरोली जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याला गती

धक्कादायक! एका शिक्षकानं शिकवणीसाठी येणाऱ्या अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेचा बनवलं शिकार

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.