Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक!! सणासुदीच्या दिवशीच दोन शेतकऱ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू!

बैल पोळ्याच्या या सणासुदीच्या दिवशीच शेतकऱ्यांच्या घरावर शोककळा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

यवतमाळ, दि. २७ ऑगस्ट : राळेगाव तालुक्यातील सराई गावात बैल पोळ्याचा सण साजरा होत असतांना दोन शेतकऱ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली आहे.

बैल पोळ्याचा सण हा शेतकऱ्यांसाठी दसऱ्या- दिवाळीच्या सणापेक्षाही काही कमी नसतो. आपल्यासाठी शेतात राबणाऱ्या बैलाचे कौतुक करण्याचा हा सण. या दिवशी बैलांना सजविले जाते आणि सजविण्यापूर्वी बैलांना आंघोळ घातली जाते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अशा या आनंदाच्या दिवशी आपल्या बैलजोडीला आंघोळ घालण्यासाठी गजानन राजूरकर (२५) आणि रावबा टेकाम (४२) हे दोघे बैलजोडीला घेऊन गावातील ठमके यांच्या शेतात गेले होते.

तेथे तलावसदृश्य असलेल्या खड्ड्यात बैलजोडी घेऊन उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने ते गाळात फसले आणि दोघांचाही बुडून मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र गावात शोककळा पसरली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

रेल्वे स्थानकातील लिफ्टमध्ये प्रवासी अटकले…प्रवाशांवर श्वास कोंडल्याने गुदमरून जाण्याची वेळ…

नायगावमध्ये अल्पवयीन तरुणीचा बॅग मध्ये सापडला मृतदेह

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.