Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रेल्वे स्थानकातील लिफ्टमध्ये प्रवासी अटकले…प्रवाशांवर श्वास कोंडल्याने गुदमरून जाण्याची वेळ…

पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकात लिफ्ट अचानक बंद.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, दि. २७ ऑगस्ट : पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक २ व ३ च्या मध्ये प्रवाशांना वर-खाली नेणारी लिफ्ट काल ऐन गर्दीच्या वेळी
रात्री साडे सातच्या दरम्यान अचानक बंद पडली.

या लिफ्टमध्ये १० ते १५ प्रवासी अडकून पडले होते. मध्येच अडकून पडल्यामुळे प्रवाशांच्या जीवाची घालमेल झाली. लिफ्ट बंद असल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागले. श्वास कोंडल्यामुळे त्याना गुदमरण्याची वेळ आली. लिफ्ट सुरू होण्याची चिन्हे दिसत नव्हती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

भयभीत झालेल्या प्रवाशांना काढण्यासाठी शेवटी लिफ्ट दुरुस्ती करणारे कंत्राटी कामगार, रेल्वेचे तंत्रज्ञ तसेच अग्निशमन दलास बोलविण्यात आले. अखेर प्रयत्नांची पराकाष्ठा करत रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना कसेबसे बाहेर काढले. आणि प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नायगावमध्ये अल्पवयीन तरुणीचा बॅग मध्ये सापडला मृतदेह

Comments are closed.