Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अज्ञात इसमाचा लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह!

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. १० डिसेंबर : अहेरी तालुक्यातील आलापल्ली गावातील सिरोंचा पूलियाजवळ आलापल्ली – सिरोंचा मार्गाच्या उजव्या कडेला जंगल परिसरात अज्ञात इसमाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.. हि घटना आज दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे.

अज्ञात इसमाचे मृतदेह एका महिलेने झाडाला लटकलेल्या अवस्थेत बघितले असता तिने सदर माहिती गावातील नागरिकांना सांगताच घटनास्थळी लोकांची एकच गर्दी जमली. मृतदेह येनाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने लटकुन कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. मयताच्या अंगावर निळा शर्ट आणि काळसर पँट घालून असल्याचे आढळले. त्याच झाडाखाली चप्पल, औषधीगोळ्या आणि नायलॉनची पिवळी दोरी आढळून आली. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर घटनेची माहिती पोलीस विभागाला प्राप्त होताच अहेरीचे पोलीस निरीक्षक किशोर मानभाव, साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद बोंडसे आपल्या चमुसह घटनास्थळी दाखल होऊन मोका पंचनामा केला व लटकलेला मृतदेह स्थानिकांच्या मदतीने खाली उतरविण्यात आला. अज्ञात इसमाचा मृत्यू चार ते पाच दिवसांपूर्वी झाला असावा असा अंदाज अहेरी पोलिसांनी वर्तवला आहे.

अज्ञात इसमाची ओळख पटलेली नसून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सदर घटनेचा पुढील तपास आहेरीचे पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा : 

मोठी बातमी :- गडचिरोलीतील नरभक्षक T6/G5 वाघीण पकडण्याची मोहीम स्थगित होणार..?

समृद्धी महामार्गाचे रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.