Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मोठी बातमी :- गडचिरोलीतील नरभक्षक T6/G5 वाघीण पकडण्याची मोहीम स्थगित होणार..?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
 ओमप्रकाश चुनारकर , 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

T6/G5 या नरभक्षक वाघिणीला पकडण्याची मोहीम आता स्थगिती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण या नरभक्षक वाघिणीसोबत पहिल्यांदाच 4 बछडे वन विभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. हे चारही बछडे अंदाजे 3 महिने वयाचे आहेत. त्यामुळे या बछड्यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या आईला पकडणे संयुक्तिक होणार नसल्याचे बोलले जात आहे.
प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर यांच्याकडून दोन महिन्यांपूर्वी T6/G5 या नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्याचे आदेश दिले होते. यासाठी वन विभागाचे कर्मचारी आणि रेस्कु टीमकडून या वाघिणीला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आता या वाघिनिसोबत चक्क 4 बछडे वन विभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाल्याने वन विभागाची मोठी अडचण झाली आहे. कारण जर या बछड्यांच्या आईला पकडले तर, इतर प्राण्यांकडून बछड्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हे बछडे जोपर्यंत सक्षम होत नाही तोपर्यंत म्हणजे अंदाजे दीड वर्ष तरी त्यांच्या आईला अर्थात T6/G5 या नरभक्षक वाघिणीला पकडणे शक्य होणार नाही.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

10, डिसेंबर :-  गडचिरोली आणि वडसा वन विभागात  हैदोस घालणाऱ्या T6/G5 या नरभक्षक वाघिणीला पकडण्याची मोहीम आता स्थगित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण या नरभक्षक वाघिणीसोबत पहिल्यांदाच 4 बछडे वन विभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. हे चारही बछडे अंदाजे 3 महिने वयाचे आहेत. त्यामुळे या बछड्यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या आईला पकडणे संयुक्तिक होणार नसल्याचे बोलले जात आहे. यासाठी वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

गडचिरोली आणि वडसा तालुक्यात अमिर्झा परिसरात T6/G5 या नरभक्षक वाघिणीने आतापर्यंत अनेक जणांचा बळी घेतल्याची तसेच अनेक गुरांचाही बळी घेतला आहे. सामान्य नागरिकांच्या जिविताचे रक्षण व्हावे यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर यांच्याकडून दोन महिन्यांपूर्वी या वाघिणीला जेरबंद करण्याचे आदेश दिले होते. यासाठी वन विभागाचे कर्मचारी आणि रेस्कु टीमकडून या वाघिणीला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आता या वाघिनिसोबत चक्क 4 बछडे वन विभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाल्याने वन विभागाची मोठी अडचण झाली आहे. कारण जर या बछड्यांच्या आईला पकडले तर, इतर प्राण्यांकडून बछड्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हे बछडे जोपर्यंत सक्षम होत नाही तोपर्यंत म्हणजे अंदाजे दीड वर्ष तरी त्यांच्या आईला अर्थात T6/G5 या नरभक्षक वाघिणीला पकडणे शक्य होणार नाही.

परंतू,या वाघिणीने आतपर्यंत घेतलेल्या निरअपराध नागरिकांचे आणि पाळीव प्राण्यांचे बळींचे गांभीर्य लक्षात घेता अशी मोहीम थांबवणे देखील समाजाच्या हिताचे ठरणार नाही. म्हणून या गोष्टीचे गांभीर्य ओळखून वन विभागाने आता गडचिरोली आणि वडसा तालुक्यातील नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचे, तसेच वन क्षेत्रात गुरे चारण्यासाठी जाऊ नये असे आवाहन केले आहे. जेणेकरून नागरिकांसोबतच नवजात चार बछडे देखील सुरक्षित राहतील.

हे देखील वाचा ,

नक्सल सप्ताहाचे अनुषंगाने भव्य शांतता व व्यसनमुक्ती रॅली चे आयोजन

Comments are closed.