Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

४ कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, …विक्री करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी केली अटक

व्हेल माशाची उलटी विक्री करणाऱ्या दोन आरोपीकडून ४ किलो १०० ग्राम वजनाची व्हेल माशाची उलटी आणि एक मोटारबाईक ठाण्याच्या पोलिसांना जप्त करण्यात मोठे यश आले आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

 

ठाणे :  व्हेल माशाची उलटी विक्री करणाऱ्या दोघा तस्करांना ठाणे गुन्हे शाखाच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी ठाण्यातून बेड्या ठोकल्या आहेत. कोरोनाच्या लॉकडाऊन मध्ये नौकरी गेली, आर्थिक परिस्थिती डबघाईला आली यामुळे तस्करी कडे वळलेल्या दोन तरुणांनी गुन्हेगारी विश्वात इंट्री घेतली, या दोघांकडून तब्बल ४ कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी आणि एक मोटारबाईक जप्त करण्यात आली आहे.

एकीकडे करोना ने लोक त्रस्त आहेत, त्यात अनेकांच्या नौकरी धंदे ठप्प झालेत, यामुळे अनेकांवर आर्थिक संकट निर्मण झाले असून यामुळेच अनेक तरुण गुन्हेगारीकडे वळू लागलेत. असेच काहीसे पाहायला मिळाले आहे. ठाण्यातील एका गुन्ह्यात. औषधांमध्ये, परफुम, खाद्यपदार्थची लज्जत वाढवण्यासाठी व्हेल माशांच्या उलटीचा उपयोग करतात.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आंतराष्ट्रीय मार्केट मध्ये करोडो रुपये किंमत असलेल्या, व्हेल माशाची उलटी विक्री करण्यास दोन जण ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरात येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा वागळे युनिटच्या पथकास मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस पथकाने गुरुवारी सायंकाळी जुना जकात नाका, घोडबंदर रोड येथे सापळा लावला होता.

              विकास घोडके – वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ठाणे गुन्हे शाखा युनिट ५

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी दोन संशयित इसम होंडा कंपनीच्या युनिकॉर्न मोटारसायकल वरून जात असताना पोलिसांना आढळून आले. दोघा मोटारसायकलस्वार इसमांना पोलिसांनी अडवून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे ४ किलो १०० ग्रॅम इतकी समुद्रात आढळणाऱ्या व्हेल माशाची उलटी आढळून आली.

मंगेश जावळे व नंदकुमार दाभोळकर असे या आरोपींची नावे असून पोलिसांनी या दोघा तस्करांना अटक करीत व्हेल माशाची उलटी व मोटारसायकल जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या उलटीची किंमत तब्बल ४ कोटी रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

                     जप्त करण्यात आलेली व्हेल माशाची उलटी

समुद्रात तरंगणारे सोन म्ह्णून ज्या वस्तूची ओळख आहे,ती म्हणजे व्हेल माशाची उलटी, औषध बनवण्यासाठी याचा उपयोग होतो, यामुळे उलटीला आंतरराष्टीय बाजारात करोड़ची किंमत आहे. हेच ओळखुन आणि कोरोना काळात आलेले आथिर्क संकटाशी दोन हाथ करण्यासाठी आरोपींची हे कृत्य केलं आहे, यांच्यावर या आधी कोणतेही गुन्हे नाहीत. अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे. तर या दोघांना ठाणे न्यायालयाने ७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हे देखील वाचा  :

पोलिस कॉन्स्टेबलची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या!

धक्कादायक!! दोन सख्ख्या मावस बहिणींची गळफास घेऊन आत्महत्या!

शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी याही वर्षी केसीसी पोर्टल द्वारे सुविधा उपलब्ध

 

 

Comments are closed.