Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण शेवटच्या घटकापर्यंत पोहचले पाहिजे : डॉ संजय ठाकरे

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, दि २८ जुलै : या शैक्षणिक सत्रापासून  या वर्षीपासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० सुरु करण्यात येत असल्याने शैक्षणिक विभागात व्यापक प्रचार प्रसार व्हावा यासाठी फायदे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लक्षात यावे तसेच विद्यार्थ्यांना याचे आकलन व्हायला पाहिजे. यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले .

या नव्या शैक्षणिक धोरणाचे समाजात असलेले समज  गैरसमज दूर झाले पाहिजे . शेवटच्या घटकापर्यंत शैक्षणिक धोरण संकल्पना पोहचायला हवी,हीच शासनाची आणि विद्यापीठाची भूमिका असल्याचे मत विभागीय सहसंचालक उच्च शिक्षण , नागपूर डॉ.संजय ठाकरे यांनी व्यक्त केले .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

२४ ते २९ जुलै या कालावधीत गोंडवाना विद्यापीठात ” राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह “ साजरा करण्यात येत आहे . या अनुषंगाने गोंडवाना विद्यापीठात आज कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . सदर कार्यशाळेला गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे , अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान डॉ. अनिल चिताडे, अधिष्ठाता आंतरविद्या शाखा डॉ. सुनील साकुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

गोंडवाना विद्यापीठात पदव्युत्तर शैक्षणिक विभागात या वर्षीपासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुरू झाले.त्यासाठी  तसा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. नवीन शैक्षणिक धोरण सर्वांनी स्वीकारावा जेणेकरून  या शैक्षणिक धोरणामुळे संपूर्ण शिक्षणव्यवस्थेत आमूलाग्र बदल होईल . त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या अंगभूत गुणांना वाव मिळून त्याच्या आवडीनुसार शिक्षण घेता येणार आहे असे मत प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे यांनी व्यक्त केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

संचालन आणि प्रास्ताविक अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान डॉ. अनिल चिताडे यांनी केले तर आभार उपकुलसचिव विद्या विभाग डॉ. हेमंत बरसागडे यांनी मानले. सदर कार्यशाळेचा लाभ संस्थाचालक,प्राचार्य व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक यांनी घेतला.

हे देखील वाचा ,

हजारो आदिवासी बेरोजगार युवा उतरले रस्त्यावर आमदार होळीं, कृष्णा गजबे, खासदार अशोक नेतें विरोधात जोरदार मुर्दाबाद च्या घोषणा करीत संताप व्यक्त…

गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील नवीन मतदारांनी मतदार नोंदणी करावी :- खासदार अशोक

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.