Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

हजारो आदिवासी बेरोजगार युवा उतरले रस्त्यावर आमदार होळीं, कृष्णा गजबे, खासदार अशोक नेतें विरोधात जोरदार मुर्दाबाद च्या घोषणा करीत संताप व्यक्त…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
आमदार डॉ. देवराव होळी यांच्या व्हायरल ऑडिओमुळे युवकांनी आंदोलनात तीव्र  संताप व्यक्त केला.ओबीसींवर अन्याय झाल्याने तलाठी भरती स्थगित करा, अशी मागणी आमदार होळी यांनी केली होती. यावर एका आदिवासी युवकाने फोन करून त्यांना जाब विचारला असता तुझ्या एका मताने निवडून येतो का, अशा शब्दांत त्यांनी त्यास सुनावल्याचा कथित ऑडिओ व्हायरल झाला होता.आणि त्यानंतर आमदार होळी यांनी विधीमंडळात गडचिरोलीला नक्षलग्रस्त, आदिवासी जिल्हा म्हणून सीएसआरचा दिला जाणारा अतिरिक्त ३० टक्के निधी बंद करावा, अशी मागणी केली होती. विशेष म्हणजे गडचिरोलीचा विकास झाला, आता निधी नको, असेही त्यांनी म्हटले होते. याचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला होता.

गडचिरोली २७ जुलै : नोकर भरतीत पेसा कायद्याची अंमलबजावणी करून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या आदिवासींप्रती होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात हजारो बेरोजगार आदिवासी युवक व युवतींनी गडचिरोलीतील इंदिरा गांधी चाैकात गुरुवारी २७ जुलै रोजी आक्रोश मोर्चा काढून जमलेल्या युवकानी भाजप आमदार डॉ. देवराव होळी, कृष्णा गजबे खासदार अशोक नेते, यांचा निषेध करीत पेसा आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा अश्या  संतप्त घोषणाबाजी करून आदिवासी सुशिक्षित बेरोजगारांनी निषेध नोंदविला .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पेसा कायद्यानुसार तलाठी भरतीत अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या जागा कमी करून त्या इतर प्रवर्गांना देण्यात आल्याचा आरोप करीत हजारो आदिवासी युवक एकत्र आले. या निर्णयाचा इंदिरा गांधी चौकात जाहीर निषेध करीत आमदार डॉ. देवराव होळीच जबाबदार असल्याचा आरोप करीत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी नारेबाजी करण्यात आली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

बिगर पेसा अंतर्गतच्या जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवाव्यात, पेसा अंतर्गत जागा वगळून ओबीसी तसेच अनुसूचित जातीच्या युवकांसाठी स्वतंत्र जागा लोकसंख्येनुसार देण्यात याव्यात, बोगस आदिवासी लोकांनी आदिवासींच्या जागा बळकावल्या आहेत व अजूनही जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नाही त्यांना नोकरीतून बडतर्फ करावे इत्यादी मागण्या करण्यात करित आंदोलनानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले.

आंदोलकांनी नारेबाजी करीत लक्ष वेधले  ये अंदर की बात है, पुलिस हमारे साथ है.. एका मताची किंमत, हजार मतांची हिंमत….. विकास कोणाचा झाला. आमदारांचा झाला.. अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी विविध मागण्यांचे तसेच निषेधाचे फलक झळकावण्यात आले. आरमोरी, धानोरा, चंद्रपूर व चामोर्शी रस्त्यावर उभे राहून जोरदार चारही रस्ते अडविले, चौक घोषणाबाजीने दणानुन सोडल्लायाने काहीकाळ वाहतूक प्रभावित झाली होती.

तलाठी पदभरतीच्या सुरुवातीच्या जाहिरातीत अनुसूचित जमातीसाठी २५८ जागा होत्या. सर्व जागा पैसा अंतर्गत गावांसाठी होत्या. मात्र, शासनाने २४ जुलै रोजी नवीन पत्रक काढले. त्यात अनुसूचित जमातीच्या २० जागा कमी केल्याने आता १३८ जागा आहेत. जागा कमी करण्यासाठी आमदार डॉ. देवराव होळी जबाबदार असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. खासदार अशोक नेते व आमदार कृष्णा गजबे हे निष्क्रिय असल्याचा दावा केला. तिन्ही नेत्यांबद्दल आदोलकांनी असंतोष व्यक्त  केला.

Comments are closed.