Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा जिद्द, संयम, इच्छाशक्ती ही अस्त्रे प्रत्येकात असणे आवश्यक – उद्योजक भरत धोटे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली,  दि. २७ मे :  स्वप्न, आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक. मोठी स्वप्न प्रत्येकांनीच पाहिली पाहिजे. मात्र ती स्वप्न साकार करण्यासाठी धडपड, प्रयत्नांची पराकाष्ठा,जिद्द, संयम,इच्छा शक्ती आदी अस्त्रे प्रत्येकात असणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन उद्योजक भरत धोटे यांनी केले.

विद्यार्थ्यांसाठी आज ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल तर्फे ‘युवक आणि उद्योजकता ‘ या विषयावर व्याख्यानाचा कार्यक्रम गोंडवाना विद्यापीठात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, प्रमुख अतिथी म्हणून कुलसचिव डॉ. अनिल झेड.चिताडे, विज्ञान व तंत्रज्ञान अधिष्ठाता तसेच मॉडेल कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरेश रेवतकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल चे समन्वयक अनिरुद्ध गचके आदी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जीवनात येणारे संकटे, चढउतारांवर मात करत कशा पद्धतीने पुढे जायचे, हे त्यांनी अनेक उदाहरणे देऊन पटवून दिले.
आपल्याला नवा उद्योग, व्यवसाय उभारायचा आहे याचा मनाशी अगोदर निश्चय करून तो कसा यशस्वी करता येईल याची काही गुपिते त्यांनी सांगितली. तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर नित्य नेमाने ध्यान करणे आवश्यक आहे. नोकरी मागण्यापेक्षा इतरांना नोकरीची संधी कशी प्राप्त करून देता येईल याकडे लक्ष द्यायला हवे, असेही ते म्हणाले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे म्हणाले ,आपण यशस्वी उद्योजक झालो तर अनेक लोकांना नौकरी ची संधी देऊ शकतो. आणि देशाच्या विकासाला हातभार लावू शकतो.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

युवक-युवतींच्या आशाळभूत नजराअन्‌ वक्‍त्यांचा हलकाफुलका विनोद आणि त्यांनी मांडलेल्या नामवंतांच्या यशोगाथेद्वारे विद्यार्थ्यांना एकप्रकारे उभारी, प्रोत्साहनच मिळाले. भरगच्च भरलेल्या सभागृहात वक्‍त्यांना मिळणारा प्रतिसाद आणि उभे राहून टाळ्यांच्या रूपाने दिलेली दाद हे कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये ठरले.

उद्योजक भारत धोटे यांचा परीचय डॉ.सुरेश रेवतकर यांनी करून दिला. प्रास्ताविक ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल चे समन्वयक डॉ.अनिरुद्ध गचके यांनी केले तर संचालन आणि आभार ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी उत्तम चंदन कांबळे यांनी केले.

हे देखील वाचा : 

ऐकावं ते नवलच ! बायकोनं दुसऱ्याशी लग्न केले, तिच्यावर कारवाई करा, चक्क नवरा बसला बायकोच्या विरोधात उपोषणाला.

वेश्याव्यवसायाला कायदेशीर मान्यता; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय…

 

Comments are closed.