Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ऐकावं ते नवलच ! बायकोनं दुसऱ्याशी लग्न केले, तिच्यावर कारवाई करा, चक्क नवरा बसला बायकोच्या विरोधात उपोषणाला.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

बुलढाणा दि,२७ मे : घर,संसार म्हटल्यावर या ना त्याना या कारणाने घरात नवरा बायकोचे भांडण होणारच हा काही नवीन प्रकार नाही. मात्र बायकोच्या विरोधात कुणी उपोषणाला बसले असेल. यापूर्वी तुम्ही ऐकले नसेल. मात्र नांदूऱ्यात एक नवरोबा चक्क बायकोच्या विरोधात उपोषणाला बसला असून त्याच्या बायकोने घटस्फोट न घेता दुसरे लग्न केलेय, त्यामुळेच तिच्यावर कारवाई करावी, अशी मागणी या नवरोबाने पोलिसांकडे केलीय.

बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्याच्या राजनगर येथील गणेश वडोदे यां नवरोबा ने नांदुरा पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना यापूर्वी निवेदन दिले होते, की त्यांच्या पत्नीने घटस्फोट न घेता दुसरे लग्न केलेय, त्यामुळे तिच्याविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी नांदुरा पोलिसांकडे केली होती.मात्र पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची कोणतीही दखल घेतली नाहीय, त्यामुळे गणेश वडोदे यांनी काल २६ मे पासून नांदुराच्या तहसील कार्यालयासमोर उपोषणा सुरू केलेय. उपोषण कर्ता आता पोलीस प्रशासन काय करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे, मात्र नवऱ्याने बायोकोच्या विरोधात उपोषणाला बसल्याने चर्चा ही होत आहे.

हे देखील वाचा,

Comments are closed.