Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

माणसाच्या मूलभूत गरजा दाखवणारा ‘गैरी’ होणार 16 डिसेंबरला प्रदर्शित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 05 नोव्हेंबर :-  वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. पण त्या गरजा माणूस जिवंत असेत तरच आहेत. माणूर जिवंतच नसेल तर त्याला कोणती गरज भासेल याचा विचार करायला लावणारा चित्रपट म्हणजे ‘गैरी’. अभिनेता मयुरेश पेम आणि अभिनेत्री नम्रता गायकवाड यांची केमिस्ट्री गैरी या चित्रपटातून प्रेक्षकांना पहावयास मिळणार आहे. हा चित्रपट 16 डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मिडीयावर प्रकाशित करण्यात आले. ‘गैरी’चे लेखन, दिग्दर्शन पांडूरंग जाधव यांनी केले आहे. मयूरेश पेम, नम्रता गायकवाड, प्रणव रावराणे, आनंद इंगळे, केतन पवार, समीर खांडेकर, सुनिल देव, कृतिका गायकवाड, देविका दफ्तरदार यांच्या चित्रपटात भुमिका आहेत. युक्ता प्राॅडक्शन्स आणि द्विजराज फिल्म्सची ही निर्मिती आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.