Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पित्ताशयात (गालब्लेडर स्टोन) खडे का होतात ? 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

 

शरीरामध्ये उजव्या बाजूला यकृत असते. यकृताच्या खाली पित्ताची पिशवी असते. तिला पित्ताशय असे म्हणतात. यकृतात तयार होणारे पित्त या पिशवीतून लहान आतड्यात येते. स्निग्ध पदार्थाचे पचन होण्यासाठी पित्त आवश्यक असते. पित्ताशयात जंतूंमुळे दाह झाल्यावर बऱ्याचवेळा नंतर खडे तयार होतात. या खड्यांचे दोन प्रकार आहेत. कोलेस्टेरॉल ७० टक्क्यांच्या वर असलेले कोलेस्टरॉल खडे, हा पहिला व कोलेस्टेरॉल १० टक्क्यांहून कमी असलेले रंगद्रव्य खडे हा दुसरा प्रकार.

जंतूसंसर्गामुळे पित्ताशयात प्रथिनयुक्त पदार्थ तयार होतात (पेशी नष्ट झाल्यामुळे). या प्रथिनयुक्त पदार्थांच्या सहाय्याने मग इतर क्षार तेथे गोळा होतात व मग खडे तयार होतात. विषमज्वर झालेल्या रुग्णामध्येही कालांतराने पित्ताशयात खडे तयार होतात. चाळीशी ओलांडलेल्या दोन-तीन मुले झालेल्या, लठ्ठ स्त्रीमध्ये पित्ताशयातील खडे होण्याचे प्रमाण जास्त असते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पित्ताशयात खडे झाले, तरी कित्येक वेळा कोणतेही लक्षण निर्माण होत नाही. मात्र काही वेळा ताप, खूप जीवघेणी वेदना, हुडहुडी भरणे अशी लक्षणे दिसून येतात. वेदना खूपच तीव्र व असह्य अशी असते. त्यामुळे ताबडतोब तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. दवाखान्यात कळ थांबण्यासाठी मॉर्फीन किंवा पेंटोझोकेनचे इंजेक्शन देतात.

05 नोव्हेंबर :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.