Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पालेभाज्या आहारत घ्या, हिवाळ्यात निरोगी रहा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 05 नोव्हेंबर :- हिवाळा म्हटले कि, सर्वत्र थंड वातावरण असते. इतर ऋतुच्या तुलनेत या ऋतुमध्ये रोजच्या वापरातील अन्नघटकांचे प्रमाण वाढवायला हवे असा सल्ला आहारतज्ञ देत असतात. शिवाय आजारांपासून दूर राहण्यासाठी या काळात भरपूर व्यायामही करायला हवा. शरीराची अधिक उष्माकांची गरज भागेल व सर्व पोषक घटक मिळतील अशा पालेभाज्यांचे सेवन केल्यास त्याचा निरोगी आयुष्यासाठी निश्चितच फायदा होउ शकतो. हिवाळ्यात आहारामध्ये आवर्जुन विविध पालेभाज्यांचा समावेश करावा.

हिवाळा आला की, सर्दी-पडस, खोकला, ताप अशा आजारांच्या तक्रारी वाढत असतात. त्यामुळे याकाळात प्रकृतीकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. आजारापासून वाचण्यासाठी पालेभाज्या आपणाला नैसर्गिकरित्या ताकद देते. बर्याचशा पालेभाज्या आपल्याला आवडत नसतात, परंतु हिवाळ्यामध्ये सर्व प्रकारच्या पालेभाज्यांचा आहारात समावेश असायला हवा.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पालक पौष्टीक घटकांनी परिपूर्ण आहे. यात व्हिटॅमिन बी, सी आणि ई चा समावेश असतो. हिवाळ्यामध्ये अनेक आजारांपासून वाचण्यासाठी पालक महत्वाची भुमिका बजावतो. पालकामध्ये आयर्न, ओमेगा 3 फॅटी एसिड, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्रेशियम सारखे पौष्टिक घटक असतात. पालकाच्या वेगवेगळ्या डिश तयार करून आहारामध्ये त्यांचा समावेश करू शकता.

संपूर्ण भारतात सेवन केली जाणारी चाकवताची भाजी अत्यंत गुणकारी आहे. यात मॅग्रेशियम, कॅल्शियम, आयर्नमध्ये पोषक घटक असतात. यात आठ प्रकारचे व्हिटॅमिन्स असतात. या पालेभाजीत व्हिटॅमिन ए, बी 1 आणि व्हिटॅमिन सी चा समावेश असतो. तुमच्या शरीरात रक्ताची कमी असेल तर तांदूळशाच्या भाजीचे सेवन करायला हवे. या भाजीत व्हिटॅमिन ए, बी, आयर्न, कॅल्शियम आणि प्रोटिन भरपूर प्रमाणात असतात.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गाजर पौष्टिक घटकांचा खजिना आहे. सर्वाचा आवडता गाजराचा हलवा तर आपण नेहमी खातच असतो. पण हिवाळ्यात गाजराचा आहारात समावेश करायला हवा. यात व्हिटॅमिन ए, पोटॅशियम आणि आयर्न सारखे घटक असतात. सॅलेड म्हणूनही गाजराचे सेवन करायला हवे. फळ आणि भाजीपाला या दोन्ही मध्ये बीटरूटचा समावेश होतो. वजन कमी करायचे असेल तर याची चांगली मदत होउ शकते. यात सोडियम, पोटॅशियम, फायबरसारखे पोषक घटक आढळतात. रक्ताची कमी असेल तर याचे सेवन आर्वजून करावे.

हे पण वाचा :-

Comments are closed.