Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

11 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार ‘बेभान’

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 05 नोव्हेंबर :- दमदार एक्शनने भरपूर असरणार ‘बेभान’ चित्रपट येत्या 11 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अनुपसिंग ठाकूर, मृण्मयी देशपांडे, संस्कृती बालगुंडे असा प्रेमत्रिकाण पहायला मिळणार आहे.

बेभान चित्रपटाचा ट्रेलर सोशल मिडिया वर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘झाला बोभाटा’, ‘भिरकीट’ असे उत्तम चित्रपट केल्यानंतर ‘बेभान’ हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट दिग्दर्शक अनुप जगदाळे घेउन येत आहेत. दिनेश देशपांडे यांच्या कथेवर आधारित बेभान या चित्रपटाची पटकथा नितीन सुपेकर यांची आहे. आजवर अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम कल्यानंतर अनुपसिंग ठाकूर मराठीत अभिनेता म्हणून पदार्पण करत आहेत. अनुपसिंग ने बाॅडीबिल्डिंगची मिस्टर वल्र्ड ही स्पर्धा जिंकली होती. मृण्मयी देशपांडे, संस्कृती बालगुडे, स्मिता जयकर आणि संजय खापरे यांच्याही चित्रपटात मुख्य भुमिका आहेत. शशिकांत पवार प्राॅडक्शनने चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.