Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

काजोलच्या ‘सलाम वेंकी’चा ट्रेलर रिलीज

आई आणि मुलाच्या नात्याची कथा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 14 नोव्हेंबर :- अभिनेत्री काजोलच्या ‘सलाम वेंकी’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. बालदिनाच्या निमित्याने हा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. काजोलसोबतच विशाल जेठवा, राजीव खंडेलवाल, प्रकाश राज आणि अहना कुमरा यांची चित्रपटात प्रमुख भुमिका आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेत्री रेवती यांनी केले आहे. सलाम वेंकीच्या ट्रेलरमधील डायलाॅग्जने अनेकांचे लक्ष वेधले आहे. सलाम वेंकी हा चित्रपट 9 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.

काजोलच्या ‘सलाम वेंकी’ या चित्रपटात आई आणि मुलाच्या जोडीची बाॅंडिंग दाखविण्यात आली आहे. ही आई आणि मुलाची जोडी ट्रेलरमध्ये अभिनेते राजेश खन्ना यांचा ‘जिंदगी लम्बी नहीं बडी होनी चाहिए बाबू मोशाय’ हा डायलाॅग म्हणतांना दिसत आहे. ट्रेलरमध्ये दिसत आहे की सुजाता ही तिच्या मुलाची म्हणलेच व्यंकटेशची काळजी घेत असते. व्यंकटेश हा एक आजाराचा सामना करत असतो असे ट्रेलर मध्ये दिसत आहे. सुजाता ही भुमिका काजोल यांनी साकारली आहे तर व्यंकटेश ही भुमिका अभिनेता विशाल जेठवाने साकारली आहे. या चित्रपटामध्ये अमिर खान ने देखील महत्वाची भुमिका साकारली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.