Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दहावी, बारावीच्या परीक्षेत मोठा बदल !

होम सेंटर रद्द, वाढीव वेळही रद्द

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 14 नोव्हेंबर :- आगामी दहावी-बारावीच्या परीक्षांसंबंधी मोठा बदल करण्यात आला असून औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळाने याबाबत माहिती दिली आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात येणार्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी विद्याथ्र्यांना देण्यात आलेले होम सेंटर सुविधा आणि पेपर लिहिण्यासाठी दिलेला अर्धा तासाचा वाढीव वेळ रद्द करण्यात आला असल्याची माहिती विभागीय शिक्षण मंडळाचे सहसचिव वाय.एस. दाभाडे यांनी दिली आहे.

दाभाडे यांनी सांगितले की, 2023 मध्ये पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा होईल. यंदा होणार्या परीक्षेत होम सेंटर राहणार नाही, तसेचा 80 गुणांच्या पेपरसाठी दिलेला वाढीव अर्धा तास यावेळी मिळणार नाही, 60-40 गुणांसाइी असलेली अधिकची पंधरा मिनिटांची सवलत यंदा होणार्या परीक्षेत विद्याथ्र्यांना मिळणार नाही, यंदा शंभर टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा होईल, मात्र दिव्यांगांना मिळणारी सवलत कायम राहणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कोरोनाकाळात विद्याथ्र्यांची सुरक्षा लक्षात घेउन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात येणार्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी विद्याथ्र्यांना काही प्रमाणात दिलासा देण्यासाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आले होते. ज्यात परीक्षेत होम सेंअर देण्याचा निर्णय घेतला गेला होता. सोबतच 80 गुणांच्या पेपरसाठी वाढीव अर्धा तास देखील देण्यात आला होता. मात्र, आता कोरोना परिस्थिती आटोक्यात असल्याने आगामी दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी वरील निर्णय रद्द करण्यात आले आहे.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.