Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्हयात नवीन 132 कोरोनाबाधित तर 292 कोरोनामुक्त

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली,10 फेब्रुवारी : आज गडचिरोली जिल्हयात 1024 कोरोना तपासण्यांपैकी 132नवीन कोरोना बाधित आढळले असून तब्बल 292 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 36485 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 34809 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 911 झाली आहे.

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 765 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.41 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 2.50 टक्के तर मृत्यू दर 2.10 टक्के झाला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आज नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 40,अहेरी तालुक्यातील 05,आरमोरी तालुक्यातील 07, भामरागड तालुक्यातील 03, चामोर्शी तालुक्यातील 13, धानोरा तालुक्यातील 04, एटापल्ली तालुक्यातील 02, मुलचेरा तालुक्यातील 01, कोरची तालुक्यातील 01, कुरखेडा तालुक्यातील 33,सिरोंचा तालुक्यातील 01, आणि वडसा तालुक्यातील 22 जणाचा समावेश आहे.

तर आज कोरोनामुक्त झालेल्या 292 रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील 42, अहेरी तालुक्यातील 05, आरमोरी तालुक्यातील 05, भामरागड तालुक्यातील 72, चामोर्शी तालुक्यातील 50, धानोरा तालुक्यातील 30, एटापल्ली तालुक्यातील 31, सिरोंचा तालुक्यातील 30, कोरची तालुक्यातील 06,मुलचेरा तालुक्यातील 12, कुरखेडा तालुक्यातील 05,आणि वडसा तालुक्यातील 04 जणाचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

हिंगणघाट जळीतकांड निकाल : विक्की नगराळेला मरेपर्यंत जन्मठेप

११ हजार १०० रुपयांच्या बनावट नोटा बाळगल्या प्रकरणी एकास अटक

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.