Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आमदार नितेश राणे यांना आज सावंतवाडी येथील कारागृहात करणार हजर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

सिंधुदुर्ग, दि. १० फेब्रुवारी :  संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणे यांना जामीन मंजूर झाला आहे त्यामुळे त्यांना आज सावंतवाडी कारागृहात हजर करून मगच त्यांची सुटका केली जाणार आहे. नितेश राणे यांना या प्रकरणात कणकवली दिवाणी न्यायालयाने ४ फेब्रुवारीला न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

यावर सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात त्यांच्या जामीनाबाबत सुनावणी होऊन ९ फेब्रुवारीला त्यांना जामीन मंजूर झाला. दरम्यान न्यायालयीन कोठडी सुनावले नितेश राणे हे आरोग्य तपासणी साठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल होते .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आज नितेश राणे यांना कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांना पुन्हा आरोग्य तपासणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहे. यानंतर नितेश राणे यांना सावंतवाडी येथील कारागृहात हजर केले जाणार आहे . कागदपत्र पुर्ततेनंतर त्यांची कारागृहातून सुटका करण्यात येईल.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हिंगणघाट जळीतकांड निकाल : विक्की नगराळेला मरेपर्यंत जन्मठेप

११ हजार १०० रुपयांच्या बनावट नोटा बाळगल्या प्रकरणी एकास अटक

धक्कादायक! चारित्र्याच्या संशयातून पत्नीवर धारदार शस्त्राने सपासप वार! पतीविरोधात गुन्हा दाखल

 

Comments are closed.