Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दिलासादायक ! गडचिरोली जिल्हात आज बाधितांपेक्षा कोरोनामुक्तांचा आकडा वाढला

गडचिरोली जिल्ह्यात 16 मृत्यूसह आज 519 नवीन कोरोना बाधित तर 577 कोरोनामुक्त !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली दि.30 एप्रिल : आज जिल्हयात 519 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 577 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 21177 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 16225 वर पोहचली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आज 16 नवीन मृत्यूमध्ये 65 वर्षीय पुरुष आष्टी ता.चामोर्शी ,63 वर्षीय पुरुष विसोरा ता. वडसा , 43 वर्षीय पुरुष आलापल्ली ता.अहेरी, 65 वर्षीय पुरुष देसपूर ता. आरमोरी, 20 वर्षीय महिला पेट ता. चामोर्शी, 67 वर्षीय पुरुष गोगांव ता. गडचिरोली, 51 वर्षीय पुरुष वडधा ता. आरमोरी, 70 वर्षीय पुरुष वडसा, 58 वर्षीय पुरुष गडचिरोली, 33 वर्षीय पुरुष कुरखेडा , 68 वर्षीय पुरुष विसोरा ता. वडसा, 40 वर्षीय पुरुष मोझरी ता. आरमोरी, 50 वर्षीय पुरुष नागभीड जि. चंद्रपूर, 80 वर्षीय पुरुष एटापल्ली, 69 वर्षीय पुरुष हरबी डोंगरगांव ता. वडसा, 65 वर्षीय पुरुष बेलगांव ता. कुरखेडा, यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.62 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 21.50 टक्के तर मृत्यू दर 1.89 टक्के झाला.
नवीन 519 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 182, अहेरी तालुक्यातील 38, आरमोरी 46, भामरागड तालुक्यातील 07, चामोर्शी तालुक्यातील 53, धानोरा तालुक्यातील 22, एटापल्ली तालुक्यातील 46, कोरची तालुक्यातील 06, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 29, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 15, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 36 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 39 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 577 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 174, अहेरी 51, आरमोरी 69, भामरागड 13, चामोर्शी 35, धानोरा 33 , एटापल्ली 39, मुलचेरा 10, सिरोंचा 18, कोरची 18, कुरखेडा 46, तसेच वडसा येथील 71 जणांचा समावेश आहे.

Comments are closed.