Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्हयात आज नवीन 169 कोरोनाबाधित तर 111 कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि.18 जानेवारी : आज गडचिरोली जिल्हयात 902 कोरोना तपासण्यांपैकी 169 नवीन कोरोना बाधित आढळले असून तब्बल 111 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 31946 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 30457 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 738 झाली आहे.

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 751 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.34 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 2.31 टक्के तर मृत्यू दर 2.35 टक्के झाला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आज नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 104, अहेरी तालुक्यातील 07, आरमोरी तालुक्यातील 02, भामरागड तालुक्यातील 07, चामोर्शी तालुक्यातील 05, धानोरा तालुक्यातील 16, एटापल्ली तालुक्यातील 01, मुलचेरा तालुक्यातील 03, कोरची तालुक्यातील 02, कुरखेडा तालुक्यातील 15 आणि वडसा तालुक्यातील 07 जणाचा समावेश आहे.

तर आज कोरोनामुक्त झालेल्या 111 रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील 50, अहेरी तालुक्यातील 38, आरमोरी तालुक्यातील 02, भामरागड तालुक्यातील 01, चामोर्शी तालुक्यातील 03, धानोरा तालुक्यातील 03, एटापल्ली तालुक्यातील 04, सिरोंचा तालुक्यातील 01, कुरखेडा तालुक्यातील 02 आणि वडसा तालुक्यातील 07 जणाचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळात (ESIC) ५९४ जागांसाठी मेगा भरती

 

 

Comments are closed.