Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मोठी बातमी: अबू धाबी आंतराष्ट्रीय विमानतळ परिसरात ड्रोनच्या साहाय्याने हल्ला, दोन भारतीयासह एका पाकिस्तानी नागरिकाचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

वृत्तसंस्था (अबुधाबी) १७ जानेवारी: संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये अबुधाबी विमानतळ परिसरात झालेल्या ड्रोन हल्ल्यांमध्ये एकूण तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत्युमुखी पडलेल्या तिघांपैकी दोघे भारतीय नागरिक तर एक पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती आहे.

अबु धाबी विमानतळाच्या नव्या धावपट्टीचं काम सुरू असणाऱ्या परिसरात पहिला ड्रोन हल्ला झाला तर दुसरा स्फोट हा ऑईलचे टँकर उभे असणाऱ्या भागात झाला आणि त्यामुळे टँकरनी पेट घेतला. तेलाच्या टँकरचे जोरदार स्फोट झाल्यामुळे यात तिघांचा मृत्यू झाला, तर अऩेकजण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे विमानतळावर गोंधळ उडाला असून जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या हल्ल्यात आतापर्यंत सहा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती विमानतळ  प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

येमेनमधील उग्रवाद्यांनी घडवून आणला हा हल्ला

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हा हल्ला आपणच घडवून आणल्याचं येमेनमधील उग्रवादी गट असणाऱ्या हौथी या संघटनेनं म्हटलं आहे. युएई आणि येमेन यांच्यात २०१५ पासून संघर्ष सुरू असून ही त्याचीच परिणती असल्याचं या संघटनेचं म्हणणं आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

हे देखील वाचा : 

एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपेपर्यंत “या” जिल्ह्यात अडीच हजार आंदोलकांना भाजपा शिधा पुरवणार – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवरील लिपिक पदांच्या एकूण २४७ जागांंसाठी भरती

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळात (ESIC) ५९४ जागांसाठी मेगा भरती

 

Comments are closed.