Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपेपर्यंत “या” जिल्ह्यात अडीच हजार आंदोलकांना भाजपा शिधा पुरवणार – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

कोल्हापूर, दि. १७ जानेवारी :  राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील अडीच हजार एसटी कर्मचाऱ्यांची चूल पेटवण्याची जबाबदारी भाजपा घेत आहे, अशी घोषणा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी रविवारी कोल्हापुरात केली.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनस्थळी रविवारी  दि. १६ जानेवारी रोजी चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी यांनी भेट दिली. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात शिधा वाटप करण्यात आला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हा संदर्भ घेऊन चंद्रकांत पाटील यांनी संपात उतरलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना संप सुरू असेपर्यंत शिधा देण्याची जबाबदारी भाजपा घेत असल्याचं घोषित केलं. हा संप लवकरच संपुष्टात यावा, कर्मचाऱ्यांनी स्वाभिमानानं कामावर जावं, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपुष्टात आणण्यात राज्य शासन अपयशी ठरत असल्याबद्दल आमदार पाटील यांनी टीकेची झोड उठवली. राज्यात महाविकास आघाडीचा सत्ता आल्यापासून हैदोस सुरू आहे. यांचे काही तरी नक्की होणार. अंबाबाई जागी होईल आणि काहीतरी चांगले करेल ” असं साकडे त्यांनी देवीला घातलं.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शिधावाटप झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा आधार मिळाला. काही कर्मचाऱ्यांनी सरकार आमच्या रक्तानं थंड होणार असेल तर त्यासाठी आहूती देण्यास तयार आहोत, असं डोळ्यात अश्रू आणून सांगितलं. त्यावर आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांची समजूत काढली.

शासनाशी भांडू आणि न्याय मिळवू; परंतु हिंसाचार करू नका, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

आणीबाणी लादण्याचा परिणाम म्हणून इंदिरा गांधींना पराभूत व्हावं लागलं. जनता पक्षाचं सरकार आलं. त्यातून हम करे सो कायदा या देशात चालत नाही असंही दिसून आलं आहे. त्यामुळे राज्य सरकारची ताठर भूमिका जास्त काळ चालणार नाही. आंदोलन लवकरच संपुष्टात येईल, अशी अपेक्षाही आमदार पाटील यांनी व्यक्त केली.

हे देखील वाचा : 

धावत्या कार समोर येऊन एसटी चालकानी केली आत्महत्या!

स्नातकांनी उच्च ध्येय निर्धारित करून आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी प्रयत्न करावे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

आता कोरोना लसीकरणला होणार ‘उमेद’ ची मदत

 

Comments are closed.