Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

छत्तीसगड सीमेवर पोलीस – नक्षल मध्ये चकमक,नक्षली साहित्य जप्त

नक्षल्यांचा घातपात करण्याचा डाव गडचिरोली पोलिसांनी हाणून पाडला..

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली पोलीस दलाने नक्षल्यास ‘सळो की पळो’ करून सोडले आहे,कारण ही तसेच आहे, नक्षल कॅडरचे मोठे नेते गडचिरोली पोलीस दलाच्या चकमकीत मारले गेले आहेत.तर काही नक्षल आत्मसमर्पण केल्याने नक्षल चळवळ आता खिळखिळी होताना दिसून येत आहे .

गडचिरोली, दि. ०८ फेब्रुवारी : छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या वांगेतुरी गावापासून ७ किमी अंतरावर पूर्व दिशेला असलेल्या हिदूर जंगल परिसरात काल दि,०७/०२/२४ रोजी सायं सात वाजताच्या दरम्यान पोलीस- नक्षल मध्ये चकमक उडाली , यात पोलिसाचा वाढता दबाव पाहून नक्षल घनदाट व अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यानंतर पोलीस पथकाने सर्चिंग ऑपरेशन तीव्र कडून जंगल परिसर पिंजून काढत असताना नक्षल साहित्य आढळून आले आहे, यामध्ये पोलीस विभागाच्या प्रसिध्दी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार, नव्याने स्थापन केलेल्या वांगेतुरी आणि गरदेवाडा पोलीस मदत केंद्राची रेकी करण्याच्या उद्देशाने तळ ठोकून नक्षल असल्याची गुप्त माहिती पोलीस विभागाला प्राप्त झाली,

“त्या ” माहितीच्या आधारे नक्षल विरोधी पोलीस पथकाचे (C-60) चार पथक जंगल परिसरात रवाना होऊन जंगल परिसरात सर्चिंग करीत असताना सायंकाळ सात वाजता जंगलात आधीच दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलीस पथक दिसताच पथकावर अंदाधून गोळीबार केला. पोलीस पथकाने ही नक्षल्यास जशास तसे प्रत्युत्तर दिले, त्यावेळी पोलीस पथकाचा वाढता दबाव पाहून नक्षल घनदाट जंगलात अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दरम्यान नक्षलविरोधी पथकाद्वारे घटनास्थळी ऑपरेशन तीव्र करून सर्चींग करीत असताना जंगलामध्ये हिदूर गावापूर्वी ५०० मीटर अंतरावर नक्षल साहित्य आढळून येताच जप्त केले आहे .

या नक्षल साहित्यात पिट्टू, स्फोटक साहित्य, वायरचे बंडल, आयईडी बॅटरी, डिटोनेटर्स, क्लेमोर माइन्सचे हुक, सोलर पॅनेल मिळाले असून घटनास्थळी नक्षलविरोधी अभियान सक्रिय करून कोंबिग ऑपरेशन सुरू आहे.

सदरची कारवाई अपर पोलीस अधीक्षक( नक्षल अभियान) यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून C ६० पोलीस पथकाचे जिल्हाभरात कौतुक होत आहे..

 

हे देखील वाचा : 

 

टाटा सामाजिक विज्ञान संस्थानच्या सहकार्याने जिल्हातील ग्रामसभांनी केला पाचगाव येथे अभ्यास दौरा

 

Comments are closed.