Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आरक्षण वाचवण्यावर सर्व पक्षीय ओबीसी नेत्यांनी फोकस करावं- छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ आणि ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांची आज भेट झाली. यानंतर ओबीसींचा पक्षनिर्माण करणं गरजेचं आहे असं मत बैठकीत व्यक्त झाले.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

मुंबई, 6 फेब्रुवारी 2024-  मंत्री छगन भुजबळ आणि ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांची आज भेट झाली. यानंतर ओबीसींचा पक्षनिर्माण करणं गरजेचं आहे असं मत बैठकीत व्यक्त झाले तर प्रकाश शेंडगे म्हणाले, ज्यांनी आमच्या मतांवर डाका टाकलाय त्यांना घरचा रस्ता दाखवणं गरजेचं म्हणून ओबीसी-भटक्या विमुक्तांचा स्वतंत्र पक्षनिर्माण केला.

ओबीसी, भटके विमुक्त, मुस्लिम हे जर एकत्र आले तर ८० टक्के व्होट बॅक आमच्याकडे आहे. आज छगन भुजबळांचा आशिर्वाद घेण्यास आलो. पुढची रणनिती ठरवणार. आजवर इतर पक्षातील नेत्यांच्या घरासमोर खेटे मारावे लागत होते. आता ओबीसी-भटक्या विमुक्तांना तिकीट देणारी फॅक्टरी काढलीय. आमचा पक्ष, आमची मतं आणि आमचं सरकार असल्याचे त्यांनी म्हटले तर ज्यावेळी भुजबळांना बाहेर पडावंसं वाटेल ते बाहेर पडतील…तेव्हा ते आमच्या पक्षाचे नेते असतील असंही शेंडगे म्हणाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ओबीसी नेत्यांची कशासाठी बैठक वगैरे होती मला माहित नव्हतं. त्यांनी पक्ष काढायचा वगैरे निर्णय घेतलाय. माझी भूमीका ही आहे की, ओबीसी आरक्षण कसं वाचवायचं यावर फोकस आहे. कोर्टाची लढाई सुरु आहे, यावर फोकस करणं आवश्यक आहे असे छगन भुजबळ म्हणाले.

आम्ही ज्या रॅली घेतो त्यात सर्व पक्षांचे आमदार असतात. सर्व पक्षीय ओबीसी नेते रॅलीत एकत्र येतायेत. अशा वेळी जर नव्या पक्षाचा विचार केला तर इतर सर्व मंडळी काय करणार? मतप्रवाह वेगवेगळे वाहतील.  ओबीसी एकत्रित येतायेत त्यात खंड पडेल का? यावर विचार करायला हवा.  माझं स्पष्ट मत आहे की, सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी एकत्र येऊन ओबीसी आरक्षण वाचवण्यावर फोकस असायला हवा, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.