गडचिरोली जिल्हयात आज ४ कोरोनाबाधित तर ६ कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, दि. ८ जानेवारी : आज गडचिरोली जिल्हयात ७६ कोरोना तपासण्यांपैकी ४ नवीन कोरोना बाधित झाले असून ६ जणानी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित ३०९६८ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या ३०१०२ आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या ११९ झाली आहे.
आत्तापर्यंत जिल्हयात एकुण ७४७ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२० टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण ०.३८ टक्के तर मृत्यू दर २.४१ टक्के झाला आहे. आज नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील ०१, चामोर्शी तालुक्यातील ०२, आणि वडसा तालुक्यातील १ जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या ०६ रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील ३, अहेरी तालुक्यातील २ आणि एटापल्ली तालुक्यातील १ जणाचा समावेश आहे.
हे देखील वाचा :
महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळात (ESIC) ५९४ जागांसाठी मेगा भरती
मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवरील लिपिक पदांच्या एकूण २४७ जागांंसाठी भरती
Comments are closed.