Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात 22 मृत्यूसह आज 548 कोरोनामुक्त तर 431 नवीन कोरोना बाधित

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : आज जिल्हयात 431 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 548 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 25018 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 20232 वर पोहचली. तसेच सद्या 4258 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 528 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 22 नवीन मृत्यूमध्ये 65 वर्षीय पुरुष लाझेडा गडचिरोली, 48 वर्षीय पुरुष एटापल्ली, 38 वर्षीय महिला कढोली ता. कुरखेडा, 56 वर्षीय पुरुष ता. शिंदेवाही जि. चंद्रपूर , 71 वर्षीय महिला आरेवाडा ता. भामरागड, 78 वर्षीय पुरुष बेलगाव ता. कोरची, 48 वर्षीय पुरुष ता. ब्रम्हपूरी जि. चंद्रपूर, 40 वर्षीय पुरुष अहेरी, 65 वर्षीय पुरुष गडचिरोली, 36 वर्षीय पुरुष नवेगाव गडचिरोली, 60 वर्षीय पुरुष आष्टी ता. चामोर्शी, 75 वर्षीय महिला कुरखेडा, 57 वर्षीय पुरुष आरमोरी, 57 वर्षीय पुरुष गडचिरोली, 45 वर्षीय महिला सिरोंचा, 75 वर्षीय पुरुष वडसा, 68 वर्षीय पुरुष सिरोंचा, 68 वर्षीय पुरुष कोटगल गडचिरोली, 75 वर्षीय महिला वसंतपूर ता. मुलचेरा, 69 वर्षीय पुरुष एटापल्ली, 60 वर्षीय पुरुष अहेरी, 65 वर्षीय महिला धानोरा यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 80.87  टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 17.02 टक्के तर मृत्यू दर 2.11 टक्के झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Gad Corona

नवीन 431 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 106, अहेरी तालुक्यातील 70, आरमोरी 66, भामरागड तालुक्यातील 09, चामोर्शी तालुक्यातील 36, धानोरा तालुक्यातील 12, एटापल्ली तालुक्यातील 27, कोरची तालुक्यातील 04, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 23, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 7, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 25 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 46 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 558 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 132, अहेरी 56,  आरमोरी 38, भामरागड 14, चामोर्शी 72, धानोरा 17, एटापल्ली 48, मुलचेरा 26, सिरोंचा 28, कोरची 10, कुरखेडा 58 तसेच वडसा येथील 52 जणांचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

कोरोना संसर्ग पसरविणाऱ्या डॉक्टरावर अखेर गुन्हा दाखल!

मासे नेणारा ट्रक तलावात पलटी झाल्याने मासे पकडण्यासाठी नागरिकांची उडाली झुंबड

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.