Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने संत गाडगेबाबा यांच्या समाधी समोर कचऱ्याचे होम हवन, पूजन करून केले आंदोलन

अमरावती शहरातील विदारक वास्तव.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अमरावती दि.०४ ऑगस्ट : शहरात मोठ्या प्रमाणावर डेंगूचे रुग्ण आढळत असल्याने युवा आमदार रवी राणा यांची युवा स्वाभिमान पार्टी चांगलीच  आक्रमक झाली आहे,शहरात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे,तरी देखील स्वच्छता केली जात नाही,कंत्राटदार लाखो रुपये अमरावती महानगरपालिकाकडून लाटत असल्याचा आरोप करीत अमरावती येथील संत गाडगे बाबा यांच्या समाधी समोर असलेल्या घाणी जवळ युवा स्वाभिमानच्या कायकर्त्यांनी होम हवन पूजन करुण अमरावती महानगर पलिकेचा प्रतिकात्मक निषेध केला.

शहरात चहुदिशा घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात पसरलेले आहे. त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार पसरत आहे असा आरोप करण्यात आला आहे.,दोन दिवसा अगोदर युवा स्वाभिमान पार्टीने महानगर पलिकेमधे ट्रक भर कचरा टाकून निषेध नोंदविले होते. परतु महापलिकेत कोणत्याही प्रकारची सुधारना झाली नसल्याचा आरोप करत जगाला स्वछतेचे संदेश देणारे संत गाडगे महाराज यांच्या समाधी समोर महानगर पालिकेने घाणीचे साम्राज्य निर्माण करुण ठेवले आहे. या निषेधार्थ युवा स्वाभिमान पार्टी तर्फे कचरा कंटेनर समोरा होम हवन पूजन करुण पालिकेचा प्रतिकात्मक निषेध व्यक्त करून आंदोलन करण्यात आले .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा,

मोठी बातमी… MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर,

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तलासरिमध्ये ‘माझा दाखला माझी ओळख’, विद्यार्थ्यांना जातीचे दाखले देण्याचा पथदर्शी उपक्रम

सई हत्तीणीचा मृत्यू मागे “हे” आहे कारण वनविभागाने केले स्पष्ट.. सहाय्यक वनसंरक्षक व त्या पदावरील वरीष्ठ अधिकारी यांच्या मार्फत होणार चौकशी

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.