Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोलीत आज कोरोनाने दोघांचा मृत्यू; नवीन 268 कोरोनाबाधितांची नोंद तर 374 जणांची कोरोनावर मात 

गडचिरोली जिल्ह्यात सक्रीय कोरोनाबाधितांची संख्या 1233 झाली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. 29 जानेवारी : आज गडचिरोली जिल्हयात 904 कोरोना तपासण्यांपैकी 268 नवीन कोरोना बाधित आढळले असून तब्बल 374 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 34485 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 32497 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 1233 झाली आहे.

आज दोन मृत्यूमध्ये चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथील 38 वर्षीय महिलेचा समावेश असून ती किडनी आजराने ग्रस्त होती. तर गडचिरेाली तालुक्यातील 47 वर्षीय पुरुष मज्जातंतू विषयक आजाराने ग्रस्त होती. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 755 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.24 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 3.58 टक्के तर मृत्यू दर 2.19 टक्के झाला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आज नवीन 268 बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 92, अहेरी तालुक्यातील 11, आरमोरी तालुक्यातील 15, भामरागड तालुक्यातील 04, चामोर्शी तालुक्यातील 60, धानोरा तालुक्यातील 12, एटापल्ली तालुक्यातील 23, मुलचेरा तालुक्यातील 05, सिरोंचा तालुक्यातील 05, कोरची तालुक्यातील 07, कुरखेडा तालुक्यातील 08 आणि वडसा तालुक्यातील 26 जणाचा समावेश आहे.

तर आज कोरोनामुक्त झालेल्या 374 रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील 98, अहेरी तालुक्यातील 55, आरमोरी तालुक्यातील 06, भामरागड तालुक्यातील 92, चामोर्शी तालुक्यातील 17, धानोरा तालुक्यातील 13, एटापल्ली तालुक्यातील 20, मुलचेरा तालुक्यातील 19, सिरोंचा तालुक्यातील 06, कोरची तालुक्यातील 10, कुरखेडा तालुक्यातील 18,आणि वडसा तालुक्यातील 20 जणाचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

भाजपच्या माजी आमदाराची ग्रामसेवकास फोनवरून अश्लील शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल

अबब! जिल्हा परिषद कार्यालयाच्या परिसरातच खेळला जात होता जुगार, अखेर पोलिसांची पडली धाड

विद्यार्थ्यांनी नोकरी शोधण्याऐवजी रोजगार निर्माण करणारे बनले पाहिजे : केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.